#प्राणी

Showing of 235 - 248 from 248 results
गप्पा विवेक पंडित यांच्याशी (भाग : 4)

बातम्याDec 10, 2008

गप्पा विवेक पंडित यांच्याशी (भाग : 4)

10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने मानवी हक्कांबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानिमित्ताने 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये विवेक पंडित आले होते. 10 डिसेंबर 2008 मध्ये त्या घटनेला बरोबर 60 वर्षं पूर्ण होत आहेत. मानवी हक्कांचा जाहीरनामा मंजूर करण्याची वेळ जगातल्या सर्व राष्ट्रांवर आली. याचं कारण म्हणजे दुसरं महायुद्ध. राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हिटलर संपूर्ण जग पादाक्रांत करायला निघाले होते. त्यांनी एका वंशांच्या 60 लाख ज्युंची निर्दयी प्रकारे कत्तल केली होती. त्या पार्श्वभूमीवर मानवी हक्काला महत्त्व दिलं गेलं. मानवी हक्कांना कोणत्याही प्रकारच्या सीमा नाहीयेत. म्हणजे देश, वंश, रंग, वर्ण, लिंग अशा कुठल्याच सिनेमा नाहीयेत. जगाच्या पाठीवर कुठेही मानव योनीमध्ये जो जन्माला आला त्याला मिळणारे अधिकार हे संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्याने प्रत्येकाला दिले आहेत. प्रत्येक मानावाला असणा-या हक्कांची आधिकारांची जाणीव करून देण्याचा दिवस म्हणून 10 डिसेंबरकडे पाहिलं जात आहे.विवेक पंडित यांनी मानवी अधिकारांचं विश्लेषण केलं. विवेक पंडित हे ' श्रमजीवी संघटने ' चे अध्यक्ष आहेत. ते ' समर्थन ' या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. आदिवासी, वेठबिगार, बालमजूर यांच्या अधिकारांसाठी अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. भारतातल्या मानवाधिकारांविषयी विवेक पंडित सांगतात, " आपल्याकडे म्हणजे भारतात मानवी हक्क ही 1948 नंतर आलेली गोष्ट आहे, असं नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की, आपला धर्म हा जगामधला उदात्त विचार सांगणारा धर्म आहे. पण आचारामध्ये तो उदात्त आचाराऐवजी त्याच्या विरुद्ध आचाराकरणारा धर्म आहे. " त्यामुळे मानवी हक्कांचं हनन करणा-या अनेक परंपरा आपल्याकडे होत्या. त्याचसोबत आपल्याकडे समतेचं बाळकडूही फार पूर्वीपासून होतं. ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिलं आहे, ते पसायदानही माझ्यामते मानवी हक्कांचा जाहीरनामा आहे. या जाहिरनाम्याला साडेसातशे वर्षं झाली आहेत. त्या ज्ञानेश्वरांनी विश्वबंधुत्त्वाची कल्पना मांडलेली आहे. ' दुरितांचं तिमीर जावे...विश्वच धर्म सर्वे राहो जो जे वांच्छिल तो ते लाभो.. प्राणीजात... ज्ञानेश्वरांनी फक्त मानवाचा विचार केला नाहीये तर पृथ्वीवरच्या प्राणी मात्रांचा विचार केला आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीत मानवी अधिकार हे फार पूर्वीप्सून आहेत." विवेक पंडित सलाम महाराष्ट्रमध्ये प्रत्येक माणसाला असणारे नागरी आणि राजकीय अधिकार, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार, कायद्याची समानता, काम करण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशा निरनिराळ्या मानवी अधिकारांवर बोलले. ते व्हिडिओवर पाहता येईल.