प्रशांत किशोर

Showing of 27 - 40 from 40 results
Special Report : प्रशांत किशोर ठरणार का युतीचे नवे चाणक्य?

व्हिडीओFeb 6, 2019

Special Report : प्रशांत किशोर ठरणार का युतीचे नवे चाणक्य?

जेडीयूचे उपाध्यक्ष आणि प्रख्यात निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर हे आता युतीचे नवे चाणक्य ठरण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी युतीबाबत आशादायी चित्र निर्माण करणारं ट्विट केलं आहे. शिवसेना भवनात आल्यानंतर सर्वांना असं वाटलं होतं की आता तेच सेनेचं इलेक्शन कॅम्पेन सांभाळणार. कारण प्रशात किशोर यांनी केवळ उद्धव ठाकरेंशीच चर्चाच केली नाही, तर सेना खासदार, नेते, युवा सेनेला मार्गदर्शनही केलं. पण भेटीमागचं कारण काही वेगळंच असल्याचं स्पष्ट होत आहे. 'मातोश्री'मधून बाहेर आल्यानंतर प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंचं आभार मानणारं ट्विट केलं आणि सोबतच युतीचे संकेतही दिले.