Elec-widget

#प्रवासी

Showing of 859 - 872 from 893 results
हा मार्ग धोक्याचा - विक्रोळी स्थानकाचा उडाला बोजवारा

बातम्याFeb 13, 2009

हा मार्ग धोक्याचा - विक्रोळी स्थानकाचा उडाला बोजवारा

13 फेब्रुवारी, मुंबई रोहिणी गोसावी सेंट्रल रेल्वेचं विक्रोळी स्टेशन हे धोकादायक रेल्वे स्टेशन्सपैकी एक समजलं जातं. वर्षभरात जवळपास 70 ते 80 प्रवाशांना इथं फाटक क्रॉस करताना आपला जीव गमवावा लागतो. कारण विक्रोळी स्टेशनवर इस्ट वेस्ट ला जोडणारा फुटओव्हर ब्रीज नाहीेत. त्यामुळं प्रवाशांना फाटक क्रॉस करण्याशिवाय गत्यंतर नाहीये. विक्रोळी स्थानकातल्या जीवघेण्या फाटकात दर दोन-तीन दिवसांनी एकाचा तरी बळी जातोच जातो. दररोज हजारो प्रवासी इथून ये जा करतात. कारण इथला इंडस्ट्रियल परिसर. विक्रोळी स्थानकात या स्टेशनवर चार प्लॅटफॉर्म आहेत. आणि एकच ब्रीज आहे. तोही फक्त प्लॅटफॉर्मपुरताच. त्यामुळं इस्टर्नहून वेस्टला किंवा वेस्टहुन इस्टला जाण्यासाठी प्रवासी ट्रॅक क्रॉस करतात. त्यांना या फाटकाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाहीये. फुट ओव्हर ब्रीज नाहीये त्यामुळं काही लोक इथून क्रॉस करतात काही फाटकाचा वापर करतात. त्यामुळं अपघात होतात, असं प्रवाशांचं म्हणणं आहे. विक्रोळी स्टेशनातले तीन आणि चार नंबरचे प्लॅटफॉर्म हे फास्ट ट्रॅकचे आहेत. त्यामुळं क्रॉस करणार्‍यांना येणारी फास्ट लोकल दिसत नाही आणि अपघात होतात. स्टेशनच्या बाहेरच शाळाही आहे. परिणामी पूर्वकडून येणार्‍या छोट्या विद्यार्थ्यांनाही हे फाटक क्रॉस करावं लागतं. फाटक ओलांडताना विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो. गेल्या सहा महिन्यात विक्रोळी स्टेशनवर 35 लोकांचा बळी गेला आहे. आता तर विक्रोळी स्टेशनवर रेल्वेचे आणखी दोन ट्रॅक वाढवण्यात येणारेत. त्याची तयारीही रेल्वेनं सुरू केलीये.पण प्रवाशांना इस्टवेस्टला जोडणारा फुटओव्हर ब्रीज रेल्वे कधी तयार करेल याची वाट बघत हे प्रवासी रोज ट्रॅक क्रॉस करतात. मुंबईसारख्या ठिकाणी या किमान सुविधा मिळवून देण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असेल, तर ही नफ्यात चालणारी रेल्वे काय कामाची असा सवाल प्रवासी करतायत.गेल्या पंधरा दिवसात मुंबईत रेल्वे अपघातांमध्ये एकशे बेचाळीस ठार तर एकशे बावन्न जण जखमी झाले आहेत. 16 दिवसात 158 जण रेल्वे अपघातांमध्ये ठार झालेत तर 172 जण जखमी झालेत. अपघात टाळण्यासाठी तुम्ही रेल्वे ट्रॅकवरून क्रॉसिंग करू नका. कितीही उशीर झाला तरी फूटओव्हर ब्रीजचाच वापर करा आणि तुमच्यापैकी कोणीही रेल्वे प्रवाशाचा अपघात पाहिला असेल तर आम्हाला 99303 60406 या नंबरवर एसएमएस किंवा एमएमएस करा.