हरिष दिमोटे, शिर्डी, 29 एप्रिल : शिर्डी विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरलं. दिल्लीहून शिर्डीला आलेले स्पाईसजेट विमान धावपट्टी सोडून खाली उतरलं. यावेळी विमानाची चाकं मातीत रोवली गेली. जेव्हा विमान धावपट्टी सोडून खाली उतरलं तेव्हा मोठा आवाज झाला आणि मातीचा धुराडा उडाला. विमानतळावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगेच धाव घेतली आणि विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर इजा झाली नाही. दैव बलवत्तर म्हणून विमानातले सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.