प्रवाशी

Showing of 235 - 247 from 247 results
पुण्यात रिक्षाचालकांसाठी डिग्री अभ्यासक्रम

बातम्याNov 13, 2011

पुण्यात रिक्षाचालकांसाठी डिग्री अभ्यासक्रम

अद्वैत मेहता, पुणे 13 नोव्हेंबरपुण्यात रिक्षाचालकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम सुरु झाला आहे. वाढत्या महागाईमुळे, स्पर्धेमुळे आता रिक्षा चालवणे हा व्यवसाय पूर्वीसारखा फायदेशीर राहिला नाही. अर्धवट शिक्षण राहिलेल्या रिक्षाचालकांना आपलं शिक्षण पूर्ण करता यावं तसेच पार्टटाईम पूरक व्यवसाय करता यावा याकरता पुण्यात रिक्षा पंचायत आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठ या दोन संस्था पुढं सरसावल्या आहेत. वाहतूक व्यवस्थापनाचा डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मेळाव्यात सहभागी झालेले रिक्षाचालक. डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली रिक्षापंचायतीने रिक्षाचालकांकरता अर्धवट राहीलेलं शिक्षण पूर्ण करण्यासोबत रिक्षा व्यवसायाशिवाय आणखी पैसे मिळावेत याकरता नाशिकच्या मुक्त विद्यापीठाच्या मदतीने विशेष अभ्यासक्रमाची आखणी केली. पुण्यातील रिक्षाचालकांनी या अनोख्या उपक्रमाला प्रतिसाद देत हा अभ्यासक्रम शिकण्याकरता नावनोंदणीलाही सुरवात केली. या उपक्रमामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशी यांचे संबंधही सुधारण्यास मदत होणार असल्याने या उपक्रमाचे कौतुकच करायला पाहिजे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading