#प्रवाशांचे हाल

Showing of 79 - 81 from 81 results
पुण्यात रिक्षाचलक संपाचा पाचवा दिवस

बातम्याMay 5, 2009

पुण्यात रिक्षाचलक संपाचा पाचवा दिवस

5 मे, पुणे पुण्यात भाडेकपाती विरोधात रिक्षाचालकांचा संप अजूनही सुरूच आहे. या संपाचा आज पाचवा दिवस आहे. या संपाला तोंड देण्यासाठी, सिक्स सिटर रिक्शाला पुण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या रिक्शा संघटनांनी, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तर पिपरी-चिंचवडमध्येही रिक्शा संघटनांनी संप सुरू केला आहे. सीएनजी आणि एलपीजी किट बसवण्यासाठीची मुदत 30 एप्रिलला संपल्यानं रिक्षाच्या भाड्यात प्रति किमी 1 रुपये कपात करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि महसूल आयुक्त दिलीप बंड यांनी दिले. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाला विरोध करत शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी रिक्षा बंद आंदोलन सुरू केलंय. यामुळे सगळ्यात जास्त फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमटेडने (पीएमपीएल) जादा बस ची व्यवस्था केली आहे. रात्रीच्या बसेस मध्येही वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या भाड्यातही रिक्षा चालकांना भाडेकपातीचा निर्णय मागे घ्यावा असं रिक्षा संघटनांचं म्हणणं आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या पेट्रोल दर कपातीनंतरही पुण्यात रिक्षा भाडं कमी झालं नव्हतं. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी होती. रिक्षा बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून पीएमपीएलने 1300 बसगाड्या रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.