#प्रमोशन

Showing of 196 - 209 from 228 results
पश्चिम रेल्वे ठप्प, प्रवाशी खोळंबले

बातम्याJul 20, 2012

पश्चिम रेल्वे ठप्प, प्रवाशी खोळंबले

20 जुलैअखेर मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. 180 मोटारमनने पुकारलेल्या रजा आंदोलनामुळे मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य आणि सुरुवातीचे स्टेशन चर्चगेटवर लोकल जागेवर उभ्या आहेत. त्यापाठोपाठ दादर, बांद्रा, स्टेशनवर लोकल जागेवर थांबलेल्या आहे. ऐन संध्याकाळी चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ आणि त्यांत लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे मुंबईकर पुरते हाल होत आहे. स्टेशन प्रवाशांनी खच्चा-खच्च भरुन गेले आहे. प्रत्येक स्टेशनवर कोणत्याच लोकलच्या घोषणा बंद झाल्या आहे. 'इतर मार्गांने जाऊ शकतात' अशी स्पष्ट घोषणा सुरु आहे. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी बस,टॅक्सीची आधार घेतला आहे. पण टॅक्सी,बससेला लांबच्या लांब रांगा आणि न परवडणारे भाडे यामुळे मुंबईकर वेठीस गेले आहे.बेस्ट आली धावून !180 मोटारमनने अचानक रजेवर गेल्यामुळे पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. ऐन संध्याकाळी चाकरमान्याची घरी जाण्याची वेळ आणि लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे मुंबईकर 'लटकले' आहे. नेहमी प्रमाणे अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बेस्टने धाव घेतली आहे. चर्चगेट स्टेशनपासून 114 बेस्ट बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मोटारमन का गेले संपावर ?मोटरमन इन्स्ट्रक्टरच्या पाच जागा रिकाम्या होत्या. त्या जागा मोटरमनचं प्रमोशन करून भरणं आवश्यक होतं. पण अधिका-यांच्या मर्जीनं मोटरमनना डावलून इतरांना संधी दिली. हक्काची साप्ताहीक सुट्टी मिळावी, मोटारमनला एक सहाय्यक द्यावा आदी मागण्यासाठी 180 मोटरमननी आज रजा आंदोलन पुकारलं आहे. '..तर दोन मिनिटात लोकल सुरु होतील' 2010 साली मोटरमन संपावर गेले होते. यावेळी दोन मोटरमनने गाड्या चालवल्या होत्या. प्रशासनाने दोन वर्ष सर्व मोटारमनला त्रास दिला. पण ज्या दोघांनी गाड्या चालवल्या त्यांचे कॉन्फिडिशियन रिपोर्ट चांगले करुन त्यांना मोटरमन इन्स्ट्रक्टरच्या जागा देण्यात आली पण जे मोटारमन संपावर होते त्यांचे रिपोर्ट अधिकार्‍यांनी खराब केले. प्रशासानाने ताबडतोब सगळ्या मोटारमनचे रिपोर्ट दुरुस्त करावे जर त्यांनी असं केलं किंवा ठोस आश्वासन दिलं तर दोन मिनिटात गाड्या चालू होतील असं आवाहन मोटारमन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिलं. वाहतुकीची कोंडीलोकल न येत असल्यामुळे अनेक प्रवाशांनी टॅक्सी,बेस्ट स्थानकाकडे पावलं वळवली. भेटेलं त्या टॅक्सीने घरी पोहचण्यासाठी एकच धावपळ सुरु आहे. प्रवाशांना घेऊन बस,टॅक्सी भरुन वाहत आहे त्यामुळे वाहतुकीचे बारा वाजले आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची मोठी कोंडी झालीय. तासंतास ट्रॅफिक अडकून कसाबसा मार्ग काढण्याची कसरत करुन घरं गाठली जात आहे. तर दुसरीकडे संपाचा फायदा घेत टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन लूटले जात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवासी विनाकारण भरडला जातोय.