#प्रदीप जैन

VIDEO : डोंबिवलीत बंदुकीच्या धाकाने ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न

व्हिडिओAug 3, 2018

VIDEO : डोंबिवलीत बंदुकीच्या धाकाने ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न

डोंबिवली, 3 ऑगस्ट : ज्वेलर्स व्यापाऱ्यावर गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. यावेळी दोन लुटारूंना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रोडवर गावदेवी मंदिर परिसरात रमेश गोल्ड नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे. या दुकानाचे मालक रमेश नहार हे गुरुवारी रात्री दुकान बंद करून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत दुकानातला माल घेऊन निघालेल्या प्रदीप जैन नामक कामगारावर अचानक दोन जणांनी हल्ला केला. यावेळी प्रदीपवर गोळीबारही करण्यात आला, मात्र सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. यावेळी झालेल्या झटापटीत त्याच्या डोक्याला दुखापत झाली. हा सगळा प्रकार पाहून प्रदीप आणि रमेश नहार यांनी आरडाओरडा केला असता नागरिकांनी धाव घेत दोन्ही लुटारूंना पकडलं आणि बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. याप्रकरणी टिळकनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकारामागे लुटमारीचा हेतू असल्याची शक्यता सकृतदर्शनी व्यक्त होत असून लुटारू नेमके कोण आहेत आणि त्यांच्याकडे बंदूक कुठून आली? याचा तपास सध्या पोलीस करतायत. डोंबिवलीत मागील काही दिवसात अशाप्रकारच्या घटना वाढत असून पोलिसांनी या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होतेय.

Live TV

News18 Lokmat
close