#प्रणव

Showing of 612 - 618 from 618 results
मुख्यमंत्रीपदासाठी अशोक चव्हाण आघाडीवर

बातम्याDec 4, 2008

मुख्यमंत्रीपदासाठी अशोक चव्हाण आघाडीवर

4 डिसेंबर, मुंबईमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी अशोक चव्हाण यांची निवड झाली आहे. विधानभवनात आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत आमदारांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी सीएनएन-आयबीएनला दिली आहे. फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. यासंदर्भांत विशेष बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पक्ष निरीक्षक म्हणून आलेले केंद्रीय परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले, आमदारांची मतं आम्ही जाणून घेतली आहेत. उद्या ती सोनिया गांधी यांना कळवणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या नव्या उमेदवाराची घोषणा करण्यात येईल.सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण हे मूळचे पैठणमधल्या कापेश्वर गावचे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला नांदेडमधून सुरुवात झाली. 25 वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. मुंबईलाच पदवी आणि एमबीएचं शिक्षण घेऊन चव्हाण नांदेडच्या राजकारणात सक्रीय झाले. काही दिवस युवक काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर 1987ची निवडणुकीत ते नांदेडचे खासदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर 1992 मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आले. 1993 ला त्यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, ग्रामविकास तसंच गृहराज्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर 99 ला मुदखेड मतदार संघातूंन निवडून येत विलासरावांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून अशोकरावांनी कारभार सांभाळला आणि 2004च्या निवडणुकीत पुन्हा बाजी मारत विलासराव देशमुख मंत्रिमंडळात ते उद्योग आणि सांस्कृतिक खात्याचे कॅबिनेटमंत्री झाले.