#प्रणव मुखर्जी

Showing of 209 - 222 from 225 results
प्रणवदांच्या विजयामुळे एकच जल्लोष

बातम्याJul 22, 2012

प्रणवदांच्या विजयामुळे एकच जल्लोष

22 जुलैराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांची विजय झाला आणि दिल्लीमध्ये एकच जल्लोष साजरा केला गेला. प्रणवदांच्या दिल्लीतल्या घराबाहेर आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. तर त्यांच्या बीरभूममधील घरी त्यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी फटाके फोडून, रंग उधळून आणि ढोल ताशांचा गजर करत प्रणवदांचा विजय साजरा केला. तसेच त्यांच्या कोलकात्याच्या घरी त्यांच्या बहिणीनं आणि त्यांच्या नातेवाईकांनी जोरदार जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. पश्चिम बंगालला पहिल्यांदाच राष्ट्रपतीपदाचा बहुमान मिळाला. आणि म्हणूनच कोलकात्यात आणि बीरभूममध्ये आनंद द्विगुणीत झाला. देशाच्या इतर भागातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रणव मुखजीर्ंचा विजयोत्सव साजरा केला.

Live TV

News18 Lokmat
close