मुंबई, 02 फेब्रुवारी : एल्गार परिषद आयोजन प्रकरणी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे सत्र न्यायालयाने तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामिन नाकारला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तेलतुंबडेंवरील आरोपामध्ये काही तथ्य नसल्याचं म्हणाले आहेत.