#पोलीस

Showing of 3992 - 4005 from 4045 results
नापासांना प्रवेश देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

बातम्याJul 2, 2012

नापासांना प्रवेश देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

02 जुलैनागपूरमध्ये नापास विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणार्‍या एक मोठं रॅकेट उघड झालंय. आर. एस. ऍकडमी नावाची संस्था बारावी नापास विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देत असल्याचा धक्कादायक प्रकार इथं उघड झाला. आयबीएन लोकमतच्या हाती या याबाबतचा ऑडिओ पुरावाही लागला आहे. ही ऍकडमी बारावी नापास विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती मिळवून, अशा विद्यार्थ्यांना फोन करून गळाला लावायची. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून गोव्यातल्या सेंट झेव्हिअर्स संस्थेकडून त्यांची बनावट मार्कशीट्स बनवून द्यायची. आणि मग या बोगस मार्कशीट्सच्या आधारे काही विशिष्ट महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यायची. याप्रकरणी पोलिसांनी आता चौघांना अटक केली आहे. एका विद्यार्थ्याच्या मदतीने पोलिसांनी हे रॅकेट उघड केलं आणि चार जणांना अटक केली. या विद्यार्थ्यानं आर. एस. ऍकडमीच्या काउंसिलर राजश्री गजभिये हिच्याशी फोनवरुन केलेली बातचीत आयबीएन लोकमतकडे आहे. या बातचीतवरुन स्पष्ट होतंय की ही अकॅडमी कुठल्याही भीतीशिवाय, राजरोसपणे इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांशी डिल करते. या सर्व घोटाळ्यात राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाच्या अप्लिकेशन रिसिप्ट सेंटरदेखील दोषी आहे. या सेंटरने बोगस प्रमाणपत्रांवर कुठल्याही प्रकारचा आक्षेप न घेता ती मंजूर केली. नागपुरात सध्या 54 खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पण प्रवेशासाठी विद्यार्थीच मिळत नसल्याने हे प्रकार वाढल्याचं सांगण्यात येतंय. या रॅकेटचं जाळं फक्त नागपूर किंवा महाराष्ट्रच नाही तर इतरही काही राज्यात पसरलं असण्याची शक्यता आहे याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे.

Live TV

News18 Lokmat
close