#पैसे

Showing of 53 - 66 from 305 results
एकट्या महिलेने लिफ्टमध्ये जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा

बातम्याFeb 20, 2019

एकट्या महिलेने लिफ्टमध्ये जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये एका तरुणीला बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. संबंधित तरुणी लिफ्टमध्ये प्रवेश करते त्यापाठोपाठ एक व्यक्ती देखील लिफ्टमध्ये येतो. लिफ्टचे दरवाजे बंद होताच तो तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात करतो. मारहाण करतानाच त्याने तरुणीकडून पर्स हिसकावून घेतो. अतिशय निर्दयी पणे त्या मुलीला मारहाण केल्यानंतर संबंधित व्यक्ती तिच्या पर्समधील पैसे घेऊन पळून जातो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असून महिलांनी मेट्रो स्थानकाच्या लिफ्टमध्ये एकट्याने जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या मेट्रो स्थानकातील आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.