पैसे Videos in Marathi

Showing of 261 - 274 from 307 results
सोलापूर येथील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

बातम्याMay 14, 2013

सोलापूर येथील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

22 फेब्रुवारीअजित पवारांनी मागे बंड केलं, अचानक राजीनामा दिला. मग काय काका मुंबईत आले त्यांनी डोळे वटारून पाहताच सगळे आमदार मागे फिरले आणि हे एकटचे उभे राहिले. मग शेवटी काकांकडे माफी मागितली. दोन महिने हे बिनखात्याचे मंत्री राहिले. शेवटी घरच्यांच्या जीवावर जगण्याचं एक वय असतं आता हे 52 वर्षांचे झाले अजूनही काकांच्या जीवावर जगतात. काकांनी हात काढला तर साधा पानटपरीवालाही विचारणार नाही अशी विखारी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केली. तसेच दुष्काळाची परिस्थिती 1972 पेक्षा बिकट आहे. मग हे माहित असून सुद्धा राज्यात दुष्काळ कसा पडला असा थेट सवाल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना विचारला आहे. सोलापूरमध्ये झालेल्या प्रचंड जाहीर सभेत राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंंत्री सुशीलकुमार शिंदे, आऱ.आर.पाटील यांच्यावर जहरी टीका केली. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि नितिशकुमार यांचं तोंडभरून कौतुकही केलं.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौर्‍याचा पहिला टप्पा आज सोलापुरात संपला. पुढच्या टप्प्याला सुरूवात करण्याअगोदर राज ठाकरे यांनी तुळजाभवानी मंदिरात जाऊन दुष्काळ दूर होवो असं साकडं घातलं. संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेला सोलापूरकरांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली. आज सकाळी अजित पवार यांनी राज ठाकरे पोपटपंची,नक्कल करतात, टिगंल टवाळक्या करतात अशी जहरी टीका केली होती. अजित पवारांच्या या टीके चा राज यांनी ठाकरी स्टाईलने चांगला समाचार घेतला. म्हणे मी सकाळी उठत नाही त्यामुळे दुपारी सभा घेत नाही. मग काय तुम्ही सकाळी मला चहा द्यायला येतात का ? तुम्हाला काय करायचे कोणी किती वाजताही उठो. उलट हेच पैसे मोजत बसता, कुठे लपवायचे याचा विचार करतात यांनाच झोपा लागत नाही. आम्हाला याची गरज नाही. मागे काय तर यांनी बंड केलं. कसला बंड पुकारताय. यांना वाटलं आमदार आपल्या पाठीशी आहे. त्याबळावर राजीनामा दिला. तीन दिवसानंतर शरद पवार मुंबईत आले. त्यांनी डोळे वटारून पाहताच सगळे आमदार मागे फिरले. हे एकटचे राहिले. मग काय कसा माफीनामा सादर केला हे आम्हाला चांगलेच माहित आहे. दोन महिने बिनखात्याचे मंत्री राहिले. आता घरच्यांच्या जीवावर जगण्याचं एक वय असतं. हे 52 वर्षांचे झाले अजूनही काकांच्या जीवावर जगतात. काकांनी हातवर केला तर साधा पानटपरीवालाही ओळखणार नाही अशी विखारी टीका राज ठाकरे यांनी केली.सुशीलकुमार शिंदे बिनकामांचे मंत्री आज सकाळी सोलापुरात दाखल झालो. तेव्हा एक टेलर भेटायला आला होता. म्हणे सुशीलकुमार शिंदेंचे कपडे मीच शिवतो, तुमचेपण शिवतो.सोलापुरात माप काढण्याची चांगली पद्धत आहे. मी असं माप देणार नाही. आणि कशावरून त्यांचे कपडे शिवतो. जरी त्यांचा टेलर असला तरी त्याच्याकडेच कपडे का शिवावे. जर कपडे शिवले तर सुशीलकुमार शिंदेंसारखाच बिनकामांचा मंत्री होण्याची पाळी माझ्यावर येईल. बर शिंदे हे महाराष्ट्राचेच, जेष्ठ नेते याबद्दल आदर आहे. पण आदर एका बाजूला राजकारण दुसर्‍या बाजूला. शिंदे महाराष्ट्रातून केंद्रात गेले मग यांनी राज्यासाठी काय केलं ? काही विचारलं तर नेहमीच उत्तर मी पट्टेवाला होतो,मग सबइन्स्पेक्टर झालो, मुख्यमंत्री झालो,सोनिया गांधींनी संधी दिली, दलित नेत्याला मोठं केलं अशी उत्तर देतात तर मग आता दलितांसाठी काय केलं ? शिंदे हे राजकारणातले शशी कपूर आहे. जे चाललंय त्यात हे आनंदी अशी खोचक टीका राज यांनी केली. राज्यात दुष्काळ पडला कसा ?राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी यांच्या मुला-मुलीचे शाही लग्न केलं. यावर शरद पवार यांनी जाधव यांना चांगलेच सोलपाटून काढले. मान्य आहे पवारसाहेब राज्यात दुष्काळ पडला आहे. पण हा दुष्काळ पडला कसा ? गेली कित्येक वर्ष पाटबंधारे खाते तुमच्या पुतण्याच्या हातात आहे. ना कुठे धरणं उभी राहिली नाही, ना कुठे पाणी पुरवठा नाही. मग कुठे गेले 70 हजार कोटी ? दुष्काळ हा काही भूकंप नाही, पूर नाही जो अचानक येतो. दुष्काळ चोर पावलाने येतो आणि दुष्काळाबाबत अगोदरच कळते. आताचा दुष्काळ हा 1972 पेक्षा भीषण आहे हे शरद पवार यांनी कबूल केलं आहे. मग दुष्काळ कसा पडला ? कुठे आहे नियोजन, का नियोजनात कमी पडले. सिंचनावर 70 हजार कोटी खर्च केले मग दुष्काळ पडला कसा ? असा थेट सवाल राज यांनी शरद पवारांना विचारला आहे.नरेंद्र मोदी आणि नितिशकुमार यांचे कौतुकराज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे गुजरातचे उदाहरण देऊन नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं. पण यावेळी मोदींच्या बाजूला राज यांनी नितीशकुमार यांनाही बसवलं. गुजरातच्या कच्छ भागात नर्मदा नदीचे पाणी अडवून कॅनालच्या मदतीने पुरवण्यात आलं. यामुळे तिथल्या शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला. मोदींसारख्या मुख्यमंत्र्यांचे काम पाहता राज्यातील मंत्र्यांनी काही तरी शिकावे असा टोला लगावला. तर नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गुन्हेगारांचे अटकसत्र सुरू केले. वर्षभरात तब्बल 50 हजार गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र आपल्याकडे गृहमंत्रीच पुळचट असल्यामुळे सरकारचा कोणालाही धाक राहिला नाही अशी टीकाही आर.आर.पाटील यांच्यावर केली.