News18 Lokmat

#पैसे

Showing of 14 - 27 from 294 results
VIDEO : लग्नाला स्विफ्टने जायचे, 1000 रुपये अहेर करून सोनं लुटायचे!

व्हिडिओJun 20, 2019

VIDEO : लग्नाला स्विफ्टने जायचे, 1000 रुपये अहेर करून सोनं लुटायचे!

पुणे, 24 जून : मंगल कार्यालयात लग्नातल्या वऱ्हाडी मंडळींचे दागिने आणि पैसे चोरणाऱ्या पती-पत्नीला पुण्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. विलास दगडे आणि त्याची पत्नी जयश्री दगडे हे दोघंही सजून धजून जाऊन फेटे बांधून मोठ्या लग्नांमध्ये जायचे आणि वधूपक्षात जाऊन तयारीची लगबग सुरू असताना आरोपी महिला भरपूर सोनं घालून जायची त्यामुळे तिच्यावर संशय येत नसायचा आणि वधूपक्षातल्या महिलांचं आणि वधूचं सोनं चोरून ती गायब होत असे. ज्या लग्नामध्ये या दोघांकडे कुणाकडून आले याची चौकशी केली तर लग्नामध्ये १००० रूपयांचा अहेर ही करत होते, त्यामुळे ते नामनिराळे राहत होते. या जोडप्याने लग्नामध्ये जाण्यासाठी नवी कोरी स्विफ्ट डिजायर घेतली होती.