#पैसे

Showing of 2146 - 2159 from 2282 results
पाचशे- हजारांच्या नोटा काढून टाका !

बातम्याJun 3, 2011

पाचशे- हजारांच्या नोटा काढून टाका !

03 जूनबाबा रामदेव आणि सरकार यांच्यात आज चर्चेच्या दोन फेर्‍या झाल्या. पण त्याना यश आलं नाही. या चर्चेनंतर बाबा रामदेव यांनी उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ते राजघाटवर जाऊन रामलीला मैदानात आले. आणि त्यांनी आपल्या समर्थकांसमोर भाषण केलं. आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न करू नये असा इशारा बाबा रामदेव यांनी दिला. तसेच बाबांनी आपल्या मागण्याची यादी सरकारपुढे सादर केली. बाबांनी पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून काढून टाका, काळा पैसा साठवणे हा राष्ट्रीय गुन्हा ठरवा अशी मागणी बाबांनी केली आहे. तर चर्चा सुरूच राहील एका दिवसात तोडगा शक्य नाही असं सरकारनं स्पष्ट केलं.बाबा रामदेव यांनी आपला हेतू स्पष्ट केला. कॅबिनेट मंत्री कपील सिब्बल आणि सुबोधकांत सहाय यांच्याशी बाबा रामदेव यांच्या चर्चेच्या दोन फेर्‍या झाल्या. बाबांच्या सर्व मागण्यांवर विचार करण्याबाबत लेखी आश्वासन देण्याची तयारी सरकारने दाखवली. पण तोडगा मात्र निघाला नाही. अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू करण्याआधी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्याच पद्धतीने आज बाबा रामदेव राजघाटावर गेले. सरकारच्या प्रतिनिधींशी मैराथॉन बैठक झाल्यानंतर मीडियाशी काहीही न बोलता बाबा रामदेव सरळ राजघाटवर पोहोचले. तिथे महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केला. आणि त्यानंतर ते रामलीला मैदानावर गेले. यावेळी वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरूही त्यांच्यासोबत होते. दुसरीकडे बाबा रामदेव यांच्यासाठी सरकारने रेड कार्पेट अंथरलं अशी टीका होतेय. बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर काँग्रेसच्या नेत्यांचा राग आहे.अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे जी कोंडी झाली तशी पुन्हा होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे. त्यासाठीच पंतप्रधानांच्या घरीही एक बैठक घेण्यात आली.सरकार आणि बाबा रामदेव यांच्या चर्चेत गुंता सुटला नसल्याने त्यांचं उपोषण ठरल्याप्रमाणे सुरू होईल. या उपोषणासाठी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर त्यांच्या अनुयायांनी गर्दी केली आहे.रामदेव बाबांच्या मागण्या - परदेशी बँकांमध्ये असलेला भारतीयांचा काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा - काळा पैसा साठवणे हा राष्ट्रीय गुन्हा ठरवा - भ्रष्ट मार्गानं पैसे जमवलेल्या व्यक्तीला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा हवी- भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम लोकपालाची निर्मिती - भ्रष्टाचाराची प्रकरणं लवकर मार्गी लावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना - 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून काढून टाकाव्यात - शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि परीक्षा भारतीय भाषांतच असाव्यात- सध्याचा भूसंपादन कायदा रद्द करावा - पंतप्रधानपदाची निवडणूक थेट व्हायला हवी- लोकांच्या हितासाठी नागरी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करावी - कोणत्याही सत्ताधारी व्यक्तीविरोधात प्रत्येक नागरिकाला तक्रार दाखल करण्याचा अधिकार हवा- वेगवेगळ्या गटातल्या कामगारांसाठी देशभरात समान वेतन असावे- शेतकर्‍यांच्या हिताचा भूसंपादन कायदा लवकरात लवकर आणावा - हिंदीचा बळी देऊन इंग्रजीचा पुरस्कार नको

Live TV

News18 Lokmat
close