#पेट्रोल

Showing of 950 - 963 from 965 results
मुंबईचे 4 खासदार गायब

बातम्याJan 9, 2009

मुंबईचे 4 खासदार गायब

9 जानेवारी मुंबईमुंबईचे चार खासदार गायब आहेत. मुंबईकर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या टंचाईला तोंड देत असताना हे लोकप्रतिनिधी मुंबईचे 4 खासदार गायब आहेत. दक्षिण मुंबईचे काँग्रेस खासदार मिलिंद देवरा यांचा फोन लागत नाही. वायव्य मुंबईच्या काँग्रेस खासदार प्रिया दत्त या दिल्लीत असल्याचं त्यांचे पीए कृष्णा हेगडे यांनी सांगितलं. पण त्या बोलण्यासाठी उपलब्ध नाहीत असं त्यांनी कळवलंय. ईशान्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत यांचा फोन नेहमीप्रमाणे उचलला जात नाही. त्यांच्या घरी संपर्क साधला असता एसएमएस करा. कामत साहेब संपर्क साधतील असं सांगण्यात आलं. तर उत्तर मुंबईचे खासदार गोविंदा यांचे फोन लागत नाहीत. लोकसभेच्या वेबसाईटवर गोविंदा यांचा मोबाईल फोन नंबर देण्यात आलाय. तो राँग नंबर आहे असं फोन उचलणारा सांगतोय. हे खासदार कुठं असतील त्याची माहिती या खासदारांच्या कार्यकर्त्यांना वा सर्वसामान्य मुंबईकरांनी त्यांना कुठं पाहिलं असेल तर आयबीएन लोकमतला कळवावं. आमचा फोन नंबर आहे.022-66899204 किंवा आम्हाला एसएमएस करा त्यासाठी टाईप करा आयबीएनएल<स्पेस> तुमची माहिती आणि पाठवा 52622 या क्रमांकावर.