#पेट्रोल

Showing of 79 - 92 from 392 results
VIDEO: काँग्रेस आमदार नसीम खानवर गणेश मंडपात उधळले पैसे!

मुंबईSep 18, 2018

VIDEO: काँग्रेस आमदार नसीम खानवर गणेश मंडपात उधळले पैसे!

मुंबई, 18 सप्टेंबर : काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नसीम खान यांच्यावर गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी पैसे उडवताणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्ष एकीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढ, नोटबंदी फसली, बेरोजगारी यावरून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. पण नोटा उडवताना आणि अंगावर पडत असताना नसीम खान मात्र हसत हसत पैश्याच्या पावसात उभे असलेले दिसतात. त्यांनी या कार्यकर्त्याना थांबवण्याचे प्रयत्न सुद्धा केलेले दिसत नाही. गणेशोत्सव सुरू असल्याने नेते मंडळी घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत आहेत. नसीम खान हे घाटकोपर पश्चिम येथे असलेल्या हिमालय गणेश मंडळाच्या गणपती दर्शनाला गेले असताना त्यांच्यावर पैसे उडवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close