#पृथ्वीराज चव्हाण

Showing of 404 - 417 from 419 results
राज यांनी काढली बाबा-दादांची नक्कल

बातम्याFeb 10, 2012

राज यांनी काढली बाबा-दादांची नक्कल

करुन दाखवलं म्हणून इकडे तिकडे बोट दाखवणार्‍या शिवसेनेनं विचका करुन दाखवलं आहे. गेल्या 16 वर्षांपासून सत्तेवर आहात सुरुवातील तीच आश्वासन दिली आणि आजही तिच आश्वासन दिली आहे तर काय करुन दाखवलं ? नुसती इकडे तिकडे बोट दाखवतात हा काय नाच आहे,ही भांगडा ?असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी पहिल्याच सभेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या नक्कली करत राज यांनी टीका केली. आज राज यांची ठाण्यात जाहीर सभा पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांच्या परीक्षा घेऊन निवडणुकीच्या मैदानात नवा पायंडा पाडला. आणि नागरिकांनी राज यांच्या उपक्रमाचं कौतुकही केलं. मुंबई, पुणे,नाशिकमध्ये रोड शो घेऊन राज ठाकरे यांनी आज ठाण्यात पहिली जाहीर सभा घेतली. राज यांच्या पहिल्या सभेसाठी कार्यकर्त्यांनी तुडुंब गर्दी केली होती. सात वाजेपासून घरातून ठाण्याकडे निघालो ट्रॅफिकमुळे इतका विचका झाला आहे की त्यामुळे इथं पर्यंत येईपर्यंत दोन झाली असं सांगत राज यांनी थेट शिवसेनेच्या करुन दाखवलं कामाचा समाचार घेतला. गेली 17 वर्ष सत्तेवर आहात तर काय काम केली हे सांगण्याची काय गरज आहे. सत्तेवर आला त्यावेळेसही हीच आश्वासन दिली आणि आजही तीच आश्वासन दिली पुन्हा त्याच गोष्टी...पण करुन काय दाखवलं ? जिकडे तिकडे रस्त्य खोदून ठेवली, परिवहन सेवा कोलमडून ठेवली हे कशासाठी ? तर कंत्राटदाराकडून, वाहन उत्पादक कंपन्याकडून टक्के घेतात, त्यांचं भागवण्यासाठी लाच घेतात असा आरोप राज ठाकरे यांनी केला. यावेळी महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातचा कसा विकास झाला हेही सांगण्यास राज विसरले नाही पण महाराष्ट्रच नंबर आहे आणि तो कायम राहु शकतो असंही राज म्हणाले. तसेच शिवाजी पार्कवर सभेसाठी कोर्टाने परवानगी नाकारली यावेळीही राज यांनी आपली नाराजी व्यक्त केली. रस्त्यावर फटाके फोडू नका, मैदानात फटाके फोडू नका हा सायलेन्स झोन आहे मग काय शौचालयात फटाके फोडायची का ? प्रत्येक ठिकाणी बंदी घालायची आहे तर निवडणुका घेताच कशाला. एकाला परवानगी दिली म्हणून दुसर्‍याला द्यावी लागणार असा अजब कारभार कशाला करताय अशी टीका राज यांनी केली. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा 15 दिवसानंतर प्रभाव कमी होईल अशी टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा समाचार घेत आताच कसे मुख्यमंत्री बडबड करायला लागले इतक्या दिवस हे गप्प कसे होते अशी शंका उपस्थित करत मुख्यमंत्र्यांची नक्कली काढली. मुख्यमंत्र्यांना बिना स्टॅम्पचं पार्सल ,कोंबडा,बाज्याची पेटी आहे अशी खिल्लीही उडवली. तर अजित पवार प्रमाणे आपल्याला पक्ष फोडायची सवय नाही. 'सत्ता हातात द्या, निधी देतो' असा आव कशाला आणतात राज्याची सत्ता हातात आहे तर विकास करुन दाखवावा असा सल्लावजा टोला राज यांनी अजित पवारांना लगावला. त्याचबरोबर राज्यात येणार्‍या परप्रांतियाची सोय करण्यासाठी काँग्रेस सोय करत आहे असा आरोपही राज यांनी केला. भाषणाच्या अखेरीस मला विरोधाला विरोध करायचा नाही पण ज्या ठिकाणी चुकले तिथे विरोध होणारच म्हणून एकवेळेस संधी देऊन पाहा सर्वाना सुतासारखं सरळ करतो असं आवाहनही राज यांनी केलं.