पृथ्वीराज चव्हाण Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 425 results
VIDEO : जेव्हा सुप्रिया सुळे बॅटिंग करतात...

व्हिडीओDec 9, 2018

VIDEO : जेव्हा सुप्रिया सुळे बॅटिंग करतात...

पुणे, 9 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात रविवारी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात काँग्रेसच्या वतीनं महिला टी-20 करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या उद्धटनाप्रसंगी मैदानात उतरून क्रिकेट खेळण्याचा मोह सुप्रिया सुळे यांना आवरला नाही. मैदानात उतरल्यानंतर खासदार सुप्रिया सुळें यांनी चांगलीच फटकेबाजी केली. पुणे महापालिकेनं उभारलेल्या या क्रिकेट मैदानाचं काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालं. त्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला होता. आणि त्यावेळेस शरद पवारांच्या गुगलीसमोर पृथ्वीराज चव्हाणांची मात्र विकेट उडाली होती.