News18 Lokmat

#पुणे

Showing of 1158 - 1171 from 1223 results
शरद पवारांनी केली सोनियांची स्तुती

बातम्याFeb 25, 2013

शरद पवारांनी केली सोनियांची स्तुती

25 फेब्रुवारी 2013पुणे - सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरुन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी कॉग्रेसमधुन बाहेर पडुन राष्ट्रवादीची स्थापना केली होती. पण आता मात्र पवारांनी याच मुद्द्यावरुन सोनिया गांधींचं कौतुक केलंय. सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा त्यावेळी आम्ही मुद्दा केला. पण पंतप्रधानपद चालत आलेलं असताना ते सोनिया गांधींनी नाकारलं ही मोठी गोष्ट असुन या गोष्टीची नोंद देशाच्या इतिहासात होईल असं पवार म्हणाले. पुण्यामध्ये हिरालाल मालु यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पवारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आचार्य किशोरजी व्यास यांनी पवारांनी देशासाठी विदेशी नेतृत्व नाकारलं याबद्दल त्यांचा सत्कार करायला पाहिजे असं ते म्हणाले त्यावर बोलताना पवारांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय चर्चेला सुरवात झालीय.