#पुणे

Showing of 53 - 66 from 945 results
International Tea Day: चहाची दुनिया नारी, 'तंदुरी चहा'ची चव भारी!

व्हिडिओDec 15, 2018

International Tea Day: चहाची दुनिया नारी, 'तंदुरी चहा'ची चव भारी!

हलिमा कुरेशी, पुणे, 15 डिसेंबर : आज देशभरात जागतिक चहा दिवस साजरा केला जात आहे. पण चहा तोच आहे फक्त पद्धतीमध्ये अनेक बदल झाले आहे. तंदुरी कबाब आणि रोटीच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह ठिकठिकाणी तंदुरी चहाने सर्वांना भुरळ झातली आहे.वाफाळणारा... मडक्यातला गरमागरम चहा कुल्लडमध्ये ओतला जातो आणि तो तुमच्या पुढ्यात ठेवला जातो. असा भन्नाट चहा बनवणारे प्रमोद बानकर आणि अमोल राजदेव हे दोघेही सायन्स ग्रॅज्युएट. पण नोकरी न करता या दोघांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. गावाकडे शेकोटीत मडकं टाकून त्यात आजीने दिलेल्या हळदीच्या दुधावरून या दोघांना तंदुर चायची कल्पना सुचली.तंदुरमध्ये खास गावातून बनवून घेतलेल्या मडक्याला भाजलं जातं, आणि कुल्लडमध्ये चहा ओतला जातो. आयटी इंजिनिअर, नोकरदारांबरोबरच गावातून शहरात हरवलेल्यांची या चहाला विशेष पसंती मिळते.

Live TV

News18 Lokmat
close