#पुणे

Showing of 40 - 53 from 979 results
VIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस!

व्हिडिओJan 21, 2019

VIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस!

वैभव सोनवणे, पुणे, 19 जानेवारी : सरपंच, सरकार, कारभारी, बकासुर ही नावं ऐकली की डोळ्यापुढं येतो तो ग्रामीण महाराष्ट्र. मात्र, ही सगळी नावं आहेत, पुण्यात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या थाळींची. पु्ण्यात मिळणाऱ्या या थाळींमध्ये आता आणखी एका थाळीची भर पडली आहे. जीचं नाव आहे 'रावण थाळी'. वडगाव मावळच्या हॉटेल शिवराजमध्ये ही रावण थाळी खवय्यांसाठी उपलब्ध असून, यामध्ये तब्बल 32 पदार्थ दिले जात आहेत. त्यात मटण, कडकनाथ चिकन, मासे, बोंबिल अशा विविध मांसाहारी पदार्थांचा अस्वाद घेता येणार आहे. एवढे सगळे प्रकार या एकाच थाळीत मिळणार आहेत. ही थाळी 9 ते 10 व्यक्तींसाठी असून, ती चौघांनी फस्त केल्यास 5 हजार रुपयांचं बक्षीस, शिवाय 3600 रुपये थाळीचं बीलही माफ केलं जाणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close