पुणे

Showing of 7177 - 7190 from 7585 results
पुण्यात ईदचा उत्साह...

बातम्याSep 11, 2010

पुण्यात ईदचा उत्साह...

11 सप्टेंबरगणपतीसोबतच आज ईदही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.पुण्यातील ईदगाह मैदानवर हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. यावेळी अभूतपूर्व सुरक्षाही ठेवण्यात आली होती.मैदानात मोबाईल नेण्यास बंदी होती. तर कार्यक्रमासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर आणि महापौर मोहनसिंग राजपाल हजर होते.मालेगावमध्ये नमाजपठणमालेगावच्या प्रमुख इदगाह मैदानावर ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाजपठण केले. शाही इमाम आणि स्थानिक आमदार मुफ्ती मोहमंद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली ही प्रार्थना झाली. जागतिक दहशतवादाचा यावेळी निषेध करण्यात आला. नाशिकमध्ये ईदच्या शुभेच्छानाशिकमध्ये इदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवानी ईद चा नमाज अदा केला. नमाजानंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे स्फोटातील आरोपी बिलालच्या अटकेनंतर नाशिकमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मैदानावरदेखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.

ताज्या बातम्या