Elec-widget

#पुणे

Showing of 6605 - 6618 from 6675 results
मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवे वर अपघात, 3 ठार

बातम्याDec 11, 2008

मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवे वर अपघात, 3 ठार

11 डिसेंबर, लोणावळा गणेश वायकरमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पहाटे तीनच्या सुमारास ट्रक आणि बसचा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त बस एका खासगी कंपनीची आहे. ती बस सातार्‍यावरून मुंबईकडं येत होती. मक्याची वाहतूक करणार्‍या ट्रकला या बसने मागून धडक दिली. भरधाव वेगात असल्यामुळे प्रवाशांच्या प्राणहानीबरोबरच या दोन्ही वाहनांचही मोठं नुकसानही झालंय.अपघाताची माहिती आयआरबीच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण आणि शहरी भागातले पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. 4 रुग्णवाहिकांमधून सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. या गंभीर जखमींपैकी एका प्रवाशाची अवस्था अतिगंभीर आहे. त्याला चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमध्ये हलवण्यात आलं आहे. तर उर्वरित जखमींना लोणावळच्या खाजगी रुग्णालायात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये फक्त एकाच व्यक्तीचं नाव कळू शकलं आहे. त्या व्यक्तीचं नाव संभाजी यशवंतराव पवार आहे. हा साताराच्या बोटीलमध्ये राहणारा असून सध्या तो व्रिकोळीमध्ये रहात होता. आणखी एक महिला आणि पुरुष या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत.