#पुणे

Showing of 6202 - 6215 from 6441 results
दीपक मानकरचं निलंबन रद्द

बातम्याJan 5, 2010

दीपक मानकरचं निलंबन रद्द

5 जानेवारी पुण्यातील लँड माफिया दीपक मानकर याचं काँग्रेसमधील निलंबन रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे मानकर याच्या काँग्रेस पुर्नप्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी निलंबन रद्दच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे. पुण्यातील यशवंत नातू यांची जमीन हडपल्याप्रकरणी काँग्रेसने मानकर यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित केलं होतं. नातू प्रकरणानंतर मानकरविरुद्ध तक्रार करण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. त्यातल्या बर्‍याच प्रकरणांची कोर्टात सुनावणी सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये मानकरला जामीन मिळाला आहे. दीपक मानकरने कोथरूडमधून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्याचा पराभव झाला होता. मानकरच निलंबन रद्द केल्यामुळे पुणेकरांनी निषेध व्यक्त केला आहे.