#पुणे

Showing of 3264 - 3277 from 3301 results
HIVने घेरले,अधिकार्‍यांनी छळले !

बातम्याMay 7, 2012

HIVने घेरले,अधिकार्‍यांनी छळले !

प्राची कुलकर्णी, पुणे07 मेसंतोष माने प्रकरणानंतर एस.टी कामगारांकडे लक्ष द्यायला सरकारने सुरुवात केली. अनेक योजना राबवल्या पण त्याच पुण्यातल्या एसटी कामगारांच्या व्यथा मात्र संपायला तयार नाही. एचआयव्ही (HIV) पॉझीटीव्ह असल्यामुळे एसटीच्या एका ड्रायव्हरला थेट गेल्या चार महिन्यांपासून घरी बसवण्यात आलं आहे. त्याला ना पगार दिला जातोय ना ड्युटी...सुरेश हे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे विभागातल्या एस.टी.डेपो मध्ये ड्रायव्हर म्हणुन काम करतायत. 2008 मध्ये ते एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालं. उपचार सुरु असतानाही ते एसटीची नोकरी करत होते, पण हळुहळू तब्येत साथ देत नसल्यामुळे त्यांना सलग सहा तासांची ड्यूटी जमेना आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर विभागातीलं कमी मेहनतीचं काम दिलं जावं अशी मागणी करणारं पत्र त्यांनी वरिष्ठांना दिलं, आणि मग सुरेश यांच्या सुरु झाल्या डॉक्टर आणि वरिष्ठांकडे चकरा. चार वेळा मेडिकल रिपोर्ट सादर करुनसुद्धा एसटीचे अधिकारी पुन्हा पुन्हा मेडिकल रिपोर्टची मागणी करत आहेत. रिपोर्टची मागणी करत सुरेश यांना ड्युटीसुध्दा देण्यात येत नाहीये आणि ड्युटी नाही त्यामुळे पगारही मिळत नाही.सुरेश यांच्या औषधांचा खर्च, घरचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आता सुरेश यांच्या पत्नीला शेतात मजुरी करावी लागतेय. आपल्या नवर्‍याला साधी शिपायाची नोकरी द्यायला अडचण काय असाच त्यांचा प्रश्न आहे.धक्कादायक गोष्ट म्हणजे कोणत्याही कारणाने ड्रायव्हरला दुसरी नोकरी देण्याची तरतूदच एसटीच्या नियमांमध्ये नसल्याचं अधिकारी सांगतायत, पण हे कॅमेरासमोर सांगायला त्यांची तयारी नाही.खरंतर आजारातून बाहेर पडण्यासाठी सुरेश यांना हवाय अधिकार्‍यांच्या मदतीचा हात...उलट हेच अधिकारी सुरेश यांच्या अडचणी आणखी वाढवायत. नोकरी नाही, पगार नाही अशा अवस्थेतून सुरेश यांची सुटका कधी होणार ? सुरेश यांना न्याय कधी मिळणार ? ना नोकरी ना पगार अशा अडचणीत सापडलेल्या कांबळेंना न्याय मिळणार का ?

Live TV

News18 Lokmat
close