#पुणे नाशिक

Showing of 92 - 99 from 99 results
वर्ष नवे, संकल्प नवे!

बातम्याMar 16, 2010

वर्ष नवे, संकल्प नवे!

17 मार्चआज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा. चैत्रपालवीने नटून, सोबत उल्हासदायक वसंत ऋतू घेऊन आलेल्या नवीन वर्षाचे आज सर्वत्र उत्साहाने स्वागत झाले. चैतन्याची गुढी उभारत आज घरोघरी पाडवा साजरा झाला. आंबा, लिंबाच्या हिरव्या पाल्यात, भरजरी नव्या वस्त्रात सजून, गळ्यात साखरमाळा आणि डोक्यावर चकाकता मंगलकलश घातलेल्या आनंदाच्या गुढ्या घराघरांवर उभारल्या गेल्या. या मुहूर्तावर शेतकर्‍यांनी गुढी उभारून वर्षभराच्या कामाचे नियोजन केले. तर मुंबईत अनेक शोभायात्रा काढून नागरिकांनी नव्या वर्षाचे स्वागत केले. या शोभायात्रांमध्ये आबालवृद्ध उत्साहाने सहभागी झाले. विलेपार्ल्यात भाजप शिवसेनेने महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्ष या संकल्पनेवर स्फूर्ती यात्रेचे आयोजन केले. महाराष्ट्राच्या कला परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे ध्वजनृत्य, लेझीम, टाळ मृदुंगाच्या तालावर सर्वांनी ताल धरला. तर लहान मुले ऐतिहासिक वेशभूषा करून या यात्रेत सहभागी झाली.डोंबिवलीती शोभायात्रेत पारंपारिक खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. ढोल ताशांची पथके हे या शोभायात्रेतील विशेष आकर्षण होते. इथे तरुणींनीही बाईकवर शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत एकूण 76 रथांचा सहभाग होता.गोरेगावातील शोभायात्रेत महिलांच्या फुगड्या रंगल्या.पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इथेही गुढीपाडव्याच्या उत्साही शोभायात्रा निघाल्या.