#पी चिंदबरम

Showing of 14 - 27 from 29 results
नक्षलवाद्यांची भारत बंदची 'हिंसक' हाक

बातम्याMay 16, 2012

नक्षलवाद्यांची भारत बंदची 'हिंसक' हाक

16 मेआज नक्षलवाद्यांनी एक दिवसाच भारत बंदच आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरु केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील टोयागोंदीचे ग्रामपंचायत कार्यालय जाळलं. त्याचबरोबर दरेकसा इथल्या बीएसएनएल (BSNL) टॉवरचीही जाळपोळ करण्यात आली. तसेच दरेकसाजवळ नक्षलवाद्यांनी एका ट्रकवर गोळीबार केला. त्यामुळे ट्रक पलटून चालकाचा मृत्यू झालाय. गडचिरोली जिल्हातील सावरगाव इथं केंद्रीय गृहमंत्री पी चिंदबरम यांचा पुतळा नक्षलवाद्यांनी जाळला. दुसर्‍या एका घटनेत माजी जिल्हा परिषद सदस्यासह तीन नागरीकाचं अपहरण नक्षलवाद्यांनी केलंय. तर अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा इथून हे अपहरण करण्यात आलंय. तर वनविभागाचा बांबूच्या डेपोचीही जाळपोळ करण्यात आलीय.