पिंपरी चिंचवड

Showing of 586 - 599 from 624 results
अजित अभ्यंकर यांच्यासह शेकडो  आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

बातम्याMar 3, 2011

अजित अभ्यंकर यांच्यासह शेकडो आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

03 मार्च जेष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांच्यासह शेकडो आंदोलनकर्त्यांना आज पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. 2007 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील दुर्बल घटकासांठी 'स्वस्तात घर 'अशी योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत शहरातील 13, 250 दुर्बल घटकांना दीड लाखात घर देण्यात येणारं होतं. तशी घोषणा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यातही करण्यात आली होती. मात्र आज चार वर्षा नंतर या योजनेत दीड लाखात मिळणार घरं तब्बल 3 लाख 75 हजार देण्यात येणार असल्याचं महानगरपाालिकेकडून सांगण्यात येतं. त्याच्या निषेधात हे आंदोलन करण्यात आलं. अजित पवार यांनी दिलेलं हे आंदोलन पाळावे अशी मागणी नागरिकांनी केली.