#पिंपरी चिंचवड

Showing of 573 - 586 from 587 results
पुण्यातील परिवहन सेवा अडचणीत

बातम्याFeb 23, 2010

पुण्यातील परिवहन सेवा अडचणीत

23 फेब्रुवारीपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील परिवहन सेवा PMPMLअडचणीत आली आहे. कामगारांच्या वेतनापोटी दोन्ही पालिकांनी 3 वर्षांसाठी परिवहन सेवेला ठराविक निधी देण्याचे कबूल केले होते. ही मुदत लवकरच संपणार आहे. पण या सेवेसाठी आता पिंपरी-चिंचवड पालिका निधी देणार नसल्याचे पालिकेने सांगितले आहे. त्यामुळे ही परिवहन सेवा बंद होण्याची चिन्हे दिसू लागलीत. पीएमपीएमएल म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड या कंपनीची स्थापना ऑगस्ट 2007 मध्ये करण्यात आली. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकांच्या बससेवा एकत्रित करून ही नवी कंपनी स्थापण्यात आली. कंपनी स्थापल्यानंतर पहिली 3 वर्षे कामगारांच्या वेतनासाठी पुणे पालिकेने 60 लाख तर पिंपरी पालिकेने 1 कोटी रुपये देण्याचे मान्य केले. त्यानुसार हा निधीही कंपनीला 3 वर्षे देण्यात आला. हा करार आता संपत आल्याने निधी देणार नसल्याचे पिंपरी चिंचवड पालिकेनं PMPMLला सांगितले आहे. तर पुणे महापालिकेने यापुढेही निधी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.