#पिंपरी चिंचवड

Showing of 14 - 27 from 292 results
VIDEO : पिंपरीमध्ये शिवशाही बसने भर रस्त्यात अचानक घेतला पेट

व्हिडिओJan 7, 2019

VIDEO : पिंपरीमध्ये शिवशाही बसने भर रस्त्यात अचानक घेतला पेट

पिंपरी-चिंचवड, 6 जानेवारी : एसटी महामंडळाची शिवशाही बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनलं आहे. शिवशाहीला होणारे अपघात काही थांबता थांबत नसल्याचं दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीजवळ रविवारी शिवशाही बसला भीषण आग लागली. भोसरीतील सर्व्हिस सेंटरमधून सकाळी शिवाजी नगरच्या दिशेन जाणाऱ्या या बसनं अचानक पेट घेतला. आग लागताच चालक पप्पू आव्हाड यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला लावली आणि त्यातून बाहेर उडी घेतली. त्यानंतर काही नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला खरा. परंतु, तोपर्यंत आग आटोक्याबाहेर गेली होती. या आगीत बस जळून खाक झाली आहे. दरम्यान, शिवशाही बसमध्ये प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळला.

Live TV

News18 Lokmat
close