पासवर्ड

Showing of 131 - 139 from 139 results
व्हायरस हल्ला झाला तर...

बातम्याJul 9, 2012

व्हायरस हल्ला झाला तर...

09 जुलैआज सोमवार हा इंटरनेट विश्वासाठी 'ब्लॅक मंडे' ठरणार आहे. कारण आज जगभरातील जवळपास 3 लाख कॉम्प्युटरवर अल्युरॉन किंवा डिएनएस चेंजर नावाचा व्हायरस हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंटरनेटशी आपले कॉम्प्युटर जोडले जाणार नाही. या अल्युरॉन व्हायरसचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसणार आहे त्यापाठोपाठ इटली आणि भारतालाही बसणार आहे. भारतात जवळपास 19 हजार 50 कॉम्प्युटराला या व्हायरसची बाधा झाल्याची माहिती समोर आलीय. सायबर गुन्हेगार बनावट डीएनएस सर्व्हरचा वापर करुन इंटरनेटवर हल्ला करण्याची माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणा एफबीआयने दिलीय. जगभरातील 3 लाख कॉंम्प्युटरांना अँल्युरॉन व्हायरसची बाधा झालीय. ज्या संगणकांवर व्हायरसचा हल्ला होईल अशा संगणकांच्या दुरस्तीसाठी एफबीआय तात्पुरते सर्व्हर बंद करणार आहे. यासंदर्भात न्यूयॉर्कमधील न्यायालयाने तसे आदेश एफबीआयला दिलेत.व्हायरसचा हल्ला कसा होतो ?ऑनलाईन खरेदी करणाचा चंग बाळगणार्‍या नेटिझन सायबर गुन्हेगारांचे पहिले लक्ष असते. सायबर गुन्हेगार एखादी ऑनलाईन खरेदीची सुविधा देणार्‍या वेबसाईटला टार्गेट करुन या वेबसाईटच्या ट्रफिकमध्ये गोंधळ करुन चुकीच्या मार्गाकडे वळवतात. तसेच डीएनएस सर्व्हरच्या साह्याने हुबेहुब अशी फेक वेबसाईट तयार करतात. यामुळे अधिकृत वेबसाईट सारखी दिसणारी वेबसाईट आपल्यासमोर येते. यामुळे ऑनलाईन खरेदी करत असताना आपल्या बँकेची तपशील, पासवर्ड सायबर गुन्हेगार प्राप्त करतात परिणामी आपल्या खात्यातून गैरव्यवहार करण्याची चावी गुन्हेगारांना मिळते. याचा बंदोबस्त करण्यासाठी 2007 पासून एफबीआय या गुन्हेगारांच्या मागावर आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी एफबीआयने या व्हायरसमुळे बाधीत झालेले सर्व्हर बंद करुन नवे सर्व्हर उभे केले आहे. त्यामुळे आज या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोमवारी रात्री 12.01 मिनीटांनी इंटरनेटसेवा बंद करण्यात आलीय. इंटरनेटशी कनेक्ट राहावे म्हणून नव्या सर्व्हरशी जोडणीही सुरु आहे.नुकसान टाळण्यासाठीअल्युरॉन किंवा डिएनएस चेंजर हा व्हायरस आपल्या पीसीत आला आहे की नाही हे लवकर समजून येत नाही. परिणामी सर्फिंग धीम्यागतीने चालते. एखादे साफ्टवेअर व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे संगणकाची कार्यप्रणाली व्यवस्थित काम करत नाही. जर आपल्या संगणकात अशा व्हायरसची बाधा झाल्याची शक्यता आपल्या असेल तर एफबीआयने एक अधिकृत वेबसाईट जारी केली. www.dns-ok.us या वेबसाईटवर जाऊन आपण आपला संगणक व्हायरसमुळे बाधीत आहे की नाही तपासून पाहु शकतात. यामध्ये आपला संगणक जर बाधीत नसेल तर हिरवा दाखवेल आणि असेल तर वेबसाईटवर बॅकराऊंड लाल रंगाचा दाखवेल. अशा वेळी ताबडतोब एफबीआयला याबद्दल माहिती द्यावी यासाठी वेबसाईटवर संपर्क साधण्यासाठी एक लिंक देण्यात आलीय. खबरदारी म्हणून आपल्या संगणकात ऍन्टीव्हायरस व्यवस्थीत कार्य करतोय का तपासून पाहा. जर अपडेट नसेल अपडेट करुन घ्या.

ताज्या बातम्या