पालखी

Showing of 248 - 258 from 258 results
किल्ले शिवनेरी ते रायगड पालखी सोहळा आयोजित

बातम्याFeb 4, 2011

किल्ले शिवनेरी ते रायगड पालखी सोहळा आयोजित

04 फेब्रुवारीछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं किल्ले शिवनेरी ते रायगड असा देशातील पहिला पालखी सोहळा काल सुरु झाला. जुन्नरमधून सुरु झालेल्या या पालखी सोहळ्यात अडिचशे युवक सहभागी झाले आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान आणि जय शिवबा प्रतिष्ठाननं या सोहळ्यांच आयोजन केलं आहेत. गौरवशाली महाराष्ट्राची विचारधारा ज्वलंत ठेवणार्‍या शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हा पालखी सोहळा आहे. मर्दानी खेळ, पोवाडे गायन आणि युद्धाचं प्रात्यक्षिक करत ही पालखी 6 फेब्रुवारीला रायगड किल्ल्यावर पोहचणार आहे.