19 जानेवारी : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. दहशतवादी संघटनांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तान विरोधात जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. जम्मू काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे बारामुल्लातील लष्कराच्या कॅम्पमध्ये एक वेगळंचं दृष्य पाहायला मिळालं. भारतीय जवानांवर दगडफेकीचे प्रकार तर नित्याचेच झाले आहे. पण इथं आलेल्या तरुणांच्या हातात दगड नव्हे तर चक्क पदवी होती. भारतीय लष्कारात भरतीसाठी हजारो स्थानिक तरुणांनी एकच गर्दी केली होती.