#पाकिस्तान

Showing of 794 - 807 from 815 results
दाऊदच्या काळ्या पैशांचा पर्दाफाश

बातम्याMay 15, 2013

दाऊदच्या काळ्या पैशांचा पर्दाफाश

05 एप्रिलभारताचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी दाऊद इब्राहिम हा अतिरेकी कारवायांसाठी पैसे पुरवत असल्याची बाब उघड आहे. पण, आणखी धक्कादायक माहिती फस्ट पोस्ट आणि सीएनएन आयबीएनच्या तपासात उघड झालीय. दाऊद आता अनेक अतिरेकी संघटनांसाठी इन्वेस्टमेंट बँकर म्हणून काम करतोय. त्याच्या या काळ्या पैशाचा कारभार दरवर्षी साडे तीन अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. इतकंच नाही तर भारताच्या एका मोठ्या बँकेच्या बहामामधल्या ब्रँचमध्ये दाऊदचा पैसा आहे. दाऊदच्या काळ्या पैशांचा पाकिस्तान ते दुबई ते बहामा असा चालणार्‍या या गोरखधंद्याचा पर्दाफाश करणारा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...भारताचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सध्या पाकिस्तानी लष्कराच्या छायेत कराचीत ठाण मांडून असल्याचं बोललं जातं. मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचणारा मास्टरमाईंड... अमेरिकेनंही त्याला अतिरेकी घोषित करून त्याची अमेरिकेतली मालमत्ता जप्त केली. पण, फस्ट पोस्ट वेबसाईट आणि सीएनएन आयबीएननं केलेल्या तपासात एक धक्कादायक माहिती पुढे आलीय. दाऊद इब्राहिम अजूनही काळ्या पैशाच्या धंद्यात आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरच्या अतिरेक्यांसाठी दाऊदकडून पैसे पुरवले जात असल्याचं माहिती मिळतेय. याचे धागेदोरे थेट बहामामध्ये सापडलेत. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भारतातल्या बँक ऑफ बडोदाच्या बहामामधल्या नासाऊ बेटावरच्या ब्रँचमधून हे व्यवहार होतात. दुबईतल्या 3 करंसी एक्सचेंजमधून नासाऊतल्या बँक ऑफ बरोदाच्या ब्रँचमधून कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल झाल्याची माहिती सराकरमधल्या अतिवरिष्ठ सूत्रांकडून मिळालीय. याबाबत बँक ऑफ बडोदाशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याच ई-मेलला उत्तर दिलेलं नाही. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार बँक कुठलाही गैरव्यवहार करत नाही. पण, नासाऊमधून हा पैसा जातो कुठे, याची चिंता सरकारला लागून आहे. अमेरिकेतील जॉर्ज मॅसोन विद्यापीठाचे पिटर्स म्हणतात, दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते. भ्रष्ट अधिकारी, ड्रग स्मग्लर्सपासून ते अतिरेक्यांपर्यंत अनेकांना हा पैसा पुरवला जातो. या तपासात आणखीही एक गोष्ट पुढे आलीय ती म्हणजे दाऊद हा दक्षिण आशियातल्या ड्रग स्मग्लर्स आणि कट्टरतावाद्यांना पैसा पुरवणारा मुख्य स्त्रोत आहे. या काळ्याधंद्यात दरवर्षी साडे तीन अब्ज डॉलर्सची उलाढाल होते. भारत सरकारनं 2011 मध्ये संयुक्त अरब अमिराट्समधल्या दाऊद इब्राहिमच्या नियंत्राखाली असलेल्या 11 कंपन्यांचे पुरावे पाकिस्तानला दिले होते. यात बँक ऑफ बरोदाच्या नासाऊ ब्रँचशी व्यवहार करणार्‍या अल-दिरहान करंसी एक्सचेंजचाही समावेश आहे. इब्राहिम हा व्यवस्थेत खोलवर मुरलाय. एखाद्या जनरलच्या मुलाला अमेरिकेच्या मोठ्या विद्यापीठात प्रवेश हवा असेल किंवा एखादा राजकीय नेता आर्थिक संकटात असेल तर तो त्यांची मदत करतो असा खुलासा इंस्टिट्युट फॉर डिफेंस अँड स्ट्रॅटेजिक ऍनालिसीसचे सुशांत सरीन यांनी केला.दाऊदच्या या करावाया पाकिस्तानसाठी मात्र फायदेशीर आहे. कारण, हा पैसा पुन्हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत येतो. 2012 मध्ये पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 10 अब्ज डॉलर्स ओतले गेले. त्याच वर्षी कराची स्टॉक एक्स्चेंज 49 टक्के वधारला. हे पैसे दाऊदचेच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय. दाऊदचा हा काळ्या पैशांचा धंदा अब्जावधींच्या घरात आहे आणि म्हणूनच अमेरिकेनं पाकिस्तानची आर्थिक मदत थांबवली आणि दाऊदला ताब्यात द्यावं, यासाठी भारतानं वारंवार दबाव टाकूनही त्याचा उपयोग होत नाही. दाऊदच साम्राज्य दिवसेंदिवस विस्तारतंय. शिवाय, एका भारतीय बँकेत दाऊदशी संबंधित पैशांचा व्यवहार होतो, हीसुद्धा एक गंभीर बाब आहे.

Live TV

News18 Lokmat
close