Elec-widget

#पाऊस

Showing of 2770 - 2783 from 2797 results
मुंबईत 24 जुलैला अतिवृष्टीची शक्यता :  डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा सज्ज

बातम्याJun 2, 2009

मुंबईत 24 जुलैला अतिवृष्टीची शक्यता : डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा सज्ज

2 जूनमुंबईत 24 जुलैला अतिवृष्टीची शक्यता असून त्यामुळे पुरपरिस्थितीही निर्माण होऊ शकते असा इशारा वेधशाळेने दिला आहे. याचं गांभीर्य लक्षात घेता आता डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा सज्ज झाल्याचं समजतंय. यावर्षी 24 जुलै रोजी समुद्रात सगळ्यात जास्त उंचीच्या म्हणजेच 5.5 मीटरच्या लाटा उसळतील. गेल्या 100 वर्षांत एवढ्या उंचीच्या लाटा समुद्रात कधीही उसळल्या नव्हत्या. 24 जुलैच्या दिवशी 200 मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर मुंबईमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली.बुधवारी 24 जून रोजी दुपारी 1:41 मिनिटांनी 4:95मीटरच्या लाटा उसळतील. तर गुरुवारी 25 जून रोजी दुपारी 2:24 मिनिटांनी 4:97 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. तर गुरुवारी 23 जुलै रोजी दुपारी 1:23 मिनिटांनी 5:01मीटरच्या लाटा उसळणार आहेत. तर शुक्रवारी 24 जुलै रोजी दुपारी 2:03 मिनिटांनी 5:05 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्या गेल्या 100 वर्षांतल्या सर्वांत मोठ्या उंचीच्या लाटा असणार आहेत. तर शनिवारी 25 जुलैला दुपारी 2:43 मिनिटांनी 4:94 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. पण याच वेळी 24 तासात 200 मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तरच मुंबई जलमय होईल. मुंबईत पाणी साचून राहू नये, परिसरातलं पाणी उपसून काढता यावं यासाठी 211 पंपाची व्यवस्था करण्यात आलीय.24 जुलै रोजी सगळ्यात मोठी हाई टाईड असल्यानं डिसास्टर यंत्रणा सज्ज झालीय आणि बीएमसीकडूनही लोकांना सतर्कतेचे एसएमएस पाठवण्यात येणार आहेत. तसंच कोणतीही अडचण आली तर लोकं 108 आणि 1916 या क्रमांकावर फोन करुन तक्रारी करु शकतील.24 जुलै रोजी पाऊस येईल अशा सूचना वेधशाळेकडून मिळाल्या आहेत. त्या दिवशी शाळांना सुट्‌ट्या दिल्या जाऊ शकतात, अशीही माहिती कमिशनर जयराज फाटक यांनी दिलीय.