पवई

Showing of 92 - 105 from 106 results
बोरुडेंचा जामीन अर्ज फेटाळला

बातम्याNov 24, 2010

बोरुडेंचा जामीन अर्ज फेटाळला

24 नोव्हेंबरबडतर्फ पोलीस निरीक्षक अरुण बोरुडे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. पवईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोरुडेवर आरोप आहे. आरोपी अरूण बोरूडे दोन आठवड्यांपासून फरार आहे. बोरूडेवर पवई आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील पवई पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे तर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीररित्या इमारतीत घुसण्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी बोरूडेच्या वकिलानं 18 नोव्हेंबरला सत्र न्यायालायात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. त्यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी बोरूडेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी जामीन मंजूर केला मात्र पवई पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोरूडेला जामीन फेटाळण्यात आला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading