पतंगराव कदम

Showing of 183 - 191 from 191 results
काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर

बातम्याDec 10, 2008

काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर

10 डिसेंबरअशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर करण्यात आलं. शपथविधीनंतर आता खातेवाटपातही घोळ करणार का, असं वाटत असताना अखेर काँग्रेसनंही यादी जाहीर केली. यात अनेक खात्यांचे फेरबदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडं नगरविकास, उद्योग खाते गृहनिर्माण आणि न्यायविधी खात ठेवण्यात आलंय. पतंगराव कदम यांच्याकड महसूल, मदत आणि पुनर्वसन, शालेय शिक्षण, तसच अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवण्यात आलाय. सहकार, सांस्कृतिक कार्य रोजगार हमी योजना आणि संसदीय कामकाज ही खाती हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आली आहेत. बाळासाहेब थोरातांकडे कृषी व जलसंवर्धन आणि राजशिष्टाचार अशी खाती आहेत. सुरूपसिंह नाईक यांच्याकडं परिवहन, अनिस अहमदांकडे वस्त्रोद्योग, क्रीडा ही खाती आहेत. युवक कल्याण तर मदन पाटील पणन, महिला व बालविकास अशी खाती सांभाळतील. सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती ही खाती चंद्रकांत हंडोरे तर रवीशेठ पाटील दुग्धविकास, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशी खाती सांभाळणार आहेत. याशिवाय इतरही महत्त्वाच्या राज्यमंत्रीपदांची खातीही जाहीर झाली आहे. त्यात सुरेश शेट्टींना वैद्यकीय शिक्षण, उच्च-तंत्रशिक्षण आणि पर्यटन, तर सिद्धराम मेहेत्रेंना ग्रामविकास आणि फलोत्पादन अशी खाती देण्यात आली आहेत. पहिल्यांदाच मंत्रीमंडळात येणार्‍या नितीन राऊतांकडे गृह, तुरुंगे, उत्पादन शुल्क आणि कामगार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर विजय वडेट्टीवारांकरडे जलस्रोत, आदिवासी विकास, वने आणि पर्यावरण या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आलाय. शोभा बच्छाव यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि नवनागरी पुरवठा खाती सोपवण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या