#पंकजा मुंडे

Showing of 66 - 79 from 230 results
VIDEO : तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही -पंकजा मुंडे

व्हिडिओJan 7, 2019

VIDEO : तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही -पंकजा मुंडे

नांदेड, 7 जानेवारी : राज्यात धगधगणाऱ्या आरक्षणाच्या प्रकरणात आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीसुद्धा उडी घेतली आहे. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही असा पक्का निर्धार त्यांनी जाहीर केला. नांदेडच्या मळेगाव इथे सुरू असलेल्या खंडोबाच्या यात्रेला त्यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी पार पडलेल्या धनगर आरक्षण जागर परिषदेत त्यांनी हे विधान केलं. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी धनगर समाजानं लावून धरली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार नेमकी कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.