#पंकजा मुंडे

Showing of 53 - 66 from 235 results
VIDEO : महिला आणि बालविकास खात्यात 65 कोटींचा मोबाईल घोटाळा - धनंजय मुंडे

मुंबईMar 7, 2019

VIDEO : महिला आणि बालविकास खात्यात 65 कोटींचा मोबाईल घोटाळा - धनंजय मुंडे

07 मार्च : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण खात्याअंतर्गत 65 कोटींचा मोबाईल घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. महिला व बालकल्याण विभागानं 30 जिल्ह्यांमधील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रामध्ये रियल- टाईम मॉनिटरींगसाठी मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी बेंगळुरुतील एम.एस सिस्टेक आयटी सोल्युशन कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा आय-7 हा मोबाईल फोन खरेदी करण्यात येणार आहे. मोबाईलचं बाजार मुल्य 6 हजार 999 रूपये असताना पंकजा मुंडे यांनी हा मोबईल तब्बल 8 हजार 777 रुपये मोजल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मुंडे विरूद्ध मुंडे असा संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.