#नीरव मोदी

VIDEO : फरार नीरव मोदी सापडला, बघा काय म्हणतोय?

व्हिडिओMar 9, 2019

VIDEO : फरार नीरव मोदी सापडला, बघा काय म्हणतोय?

09 मार्च : 13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये आहे. या ठिकाणी तो अगदी मुक्तपणे फिरत असल्याचा एक व्हिडिओ 'द टेलिग्राफ' या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं प्रसिद्ध केला. तसंच नीरव मोदीला आम्ही शोधलं असून तो 'वेस्ट एन्ड लंडन'मध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा टेलिग्राफनं केला. दरम्यान, भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती. मात्र, नीरव मोदीला भारतात परत आणण्यात सरकारला अपयश आलं होतं.