नीट

Showing of 612 - 625 from 761 results
माझी संपत्ती घ्या,तुमची मला द्या-ठाकरे

बातम्याFeb 11, 2012

माझी संपत्ती घ्या,तुमची मला द्या-ठाकरे

11 फेब्रुवारीआम्ही पैसे खाल्ले असा आरोप करणारे शरद पवार आणि नारायण राणे यांनी काय दिवे लावले आहे. आम्ही घोळ केला तर इतके दिवस काय झोपा काढल्या का ? तुम्ही काय केलं जर एवढं असेल तर एक कोरा कागद आणा त्यावर लिहून देता माझी संपत्ती मी तुमच्या नावावर करतो आणि तुमची संपत्ती माझ्या नावावर करा असे जाहीर आव्हान बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार आणि राणेंना केलं. तसेच शिवसेने सारखी सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान करत, गल्लीबोळात कुत्रेपणे पायवर करतात अशी तिखट टीका बाळासाहेबांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यावर केली. बाळासाहेबांची ठाण्याच्या सेंट्रलपार्क मैदानावर 45 वर्षानंतर भव्य सभा पार पडली.'ठाणे शिवसेनेचं...ठाण्याची शिवसेना' अशी ख्याती असलेल्या आपल्या आवडत्या ठाण्यात तब्बल 45 वर्षानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा नागरिकांच्या तुफान गर्दीत पार पडली. यावेळी बाळासाहेबांनी चौफेर ठाकरीतोफ डागली. मला मैदानासाठी हायकोर्टात जावे लागत नाही, आता मी तुम्हाला नक्कला करुन दाखवू, की इकडून दाखवू, की तिकडून दाखवू अशी नक्कल करत राज ठाकरेंना टोला लगावला. काय ह्या टिंगल,टवाळ्या निवडणूक जिंका पण मर्दासारखी जिंकून दाखवा असा प्रहार बाळासाहेबांनी केला. काय ते गल्लीबोळात सभा घेत फिरत आहात शेवटी कुत्रेपण गल्लीबोळातच खांबावर पायवर करतात जर हिंमत असेल तर शिवसेनेसारखी सभा घेऊन दाखवावी असे आव्हान बाळासाहेबांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केले. राज ठाकरे यांनी शिवसेनेनं 40 हजार कोटी खिश्यात घातले असा आरोप केला होता. राज यांच्या आरोपाचा धागा पकडत शरद पवारांनी शिवसेनेच्या या कारभाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. शरद पवारांच्या आरोपाचा समाचार घेत पुण्यातील वेंकीजची कोंबडी कोणाची आहे ती मला चांगली माहित आहे. पण ती आमच्या खुरड्यात आणणार नाही तुम्हाला परदेशातील बँकांची माहिती बरी माहित आहे मग एवढंच असेल तर मी माझी सर्व मालमत्ता तुमच्या नावावर करतो तुम्ही तुमची मालमत्ता माझ्या नावावर करा असं जाहीर आव्हान देतो आणि तिकडे तो नारोबा (नारायण राणे) हा सुध्दा संपत्ती जाहीर करण्याचे सांगतो पण याच्या बायकोच्या नावावर किती अवैध हॉटेल आहे, किती अवैध माय जमवली आहे यांचे पुरावेच बाळासाहेबांनी दाखवले आणि राणेंनी पण आपली सगळी मालमत्ता माझ्या नावावर करुन दाखवावी मी पण माझी मालमत्ता तुमच्या नावावर करतो असे जाहीर आव्हान बाळासाहेबांनी केलं. यानंतर बाळासाहेबांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली. अण्णा हा भोळा मराठी माणूस बसला आमरण उपोषणाला..कोणाच्या जोरावर तर त्या परदेशी ट्रस्टखाऊ सस्थेंच्या जीवावर पण शेवटी तेच त्यांच्यावर उलटले. मुंबईतील आंदोलन त्यांच्यामुळेच बुडाले तिकडे कोणतेही चॅनेल लावा जिकडे तिकडे 'मै अण्णा हु' हेच चालू होते अरे काय चाललं होतं. कुठे तरी गणपतीलाच टोपी घातली. मी पण एका व्यंगचित्रात गणपतीच्या उंदराला टोपी घातली शेवटी उंदीरपण म्हणाला मला पण डोक आहे असा टोलाही बाळासाहेबांनी लगावला. तसेच राज ठाकरे यांच्या न्यायालयावर नाराजीचा धागा ओढत बाळासाहेबांनी पण न्यायालयावर निशाना साधला. आम्हाला मैदान घेण्यासाठी कधी कोर्टात जावे लागले नाही. पण मैदानावर जाऊन काय फायदा. तिथेपण आवाजाची मर्यादा लावली जाते. पण कोर्टात काय चाललं हे मला कळत नाही कोर्ट काय निर्णय देतात 'टोमणे मारणे विवाहीतेचा छळ नाही', 'विवाहीत पुरषासोबत तरुणीला राहण्याची परवानगी' अरे कसे निर्णय देतात हे मला बिलकुल पटत नाही. कुठेही बंदी घालतात हे ही काही योग्य नाही असंही बाळासाहेब म्हणाले. तसेच राज यांच्या गुजरात कौतुकावर सडकून टीका केली. तिकडे होर्डिंग दिसत नाही पण वर्तमानपत्रात पानंची पानं भरुन येतात त्याच काय ? एकदा आमच्या घरी लालकृष्ण अडवाणी आले होते तेव्हा ते म्हणाले होते. नरेंद मोंदी बदल आपण काय विचार करतात ? त्यांचे काय करावे ? असा सवाल विचारला होता तेव्हा मी नरेंद्र मोदीला बाजूला केले तर गुजरात गेले समजा असा सल्ला दिला होता असंही बाळासाहेबांनी सांगितले.जाती पातीचे राजकारण हे काँग्रेसने वाढवले. कोणत्या आधारावर निवडणूका लढायाच्या याची अक्कल काँग्रेसला नाही. त्यांच्यामुळे आज जातीयवाद वाढला आहे. संपूर्ण लोकशाही त्यांनी नासवली आहे. तिकडे त्यांचे राहुल गांधी कोणाच्याही घरात जातात आणि खाली बसून जेवण करतात पण जेवण येत फाईव्ह स्टार हॉटेलमधून असा थोतांड थांबवा काँग्रेसने वाट लावून ठेवली आहे यांची सत्ता उलथून लावण्यासाठी जनतेनं डोळे उघडे ठेवून नीट पाहावे असं आवाहन बाळासाहेबांनी केलं. त्याचबरोबर कोर्टात गीतेवर, कुराण, बायबलवर हात ठेवून शपथ घेतात पण भारतीय राज्य घटनेवर हात ठेवून मी सच्चा भारतीय आहे अशी शपथ घ्या असंही बाळासाहेब म्हणाले.'आपण सगळे मिळून एकत्र राहू, सगळ्यांना मिळून खाऊ' अशी कविता करत बाळासाहेबांनी आठवले यांच्या कवीप्रेमाला दाद दिला. त्याचबरोबर तुमचा पाय घसरु देऊ नका, इकडे तिकडे जाऊ नका सगळीकडे फिरुन आला, आता शिवभक्तीकडे या असा सल्लाही त्यांनी दिला. त्याचबरोबर आता महायुतीची ताकद दाखवण्यासाठी वज्रमुठ काँग्रेसच्या टाळक्यावर हाणायची आहे. मी पुढच्या वेळेस ठाण्यात येईल तेव्हा पालिकेवर भगवा फडकलेला दिसेल असंही बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलं.