News18 Lokmat

#नितेश राणे

Showing of 235 - 248 from 264 results
सीमाप्रश्नावर आधारित 'झालाच पाहिजे' रंगभूमीवर

मनोरंजनMay 11, 2013

सीमाप्रश्नावर आधारित 'झालाच पाहिजे' रंगभूमीवर

09 एप्रिलमराठी रंगभूमीवरील अग्रगण्य नाट्यसंस्था म्हणजे नाट्यसंपदा...नाट्यसंपदा संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ही संस्था सीमाप्रश्नावर आधारित 'झालाच पाहिजे' हे नाटक रंगभूमीवर घेऊन येतेय. 'झालाच पाहिजे' या नाटकाचा मुहूर्त काल दादर शिवाजी मंदिर नाट्यगृहात अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाला. बेळगावातील मराठी माणसाची होत असणारी गळचेपी आणि गेली कित्येक वर्ष सीमाप्रश्न हा न्यायलयात अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर या नाटकाची निर्मिती करण्यात आहे. नाट्यसंपदा संस्था आणि महाराष्ट्र कला निधी प्रकाशित 'झालाच पाहिजे' या नाटकाचे लेखक प्रकाश राणे आहेत. तसंच दिग्दर्शक विजय केंकरे आणि संतोष पवार हे दोघंही या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 1 मे ला ष्णमुखानंद हॉलमध्ये होणार आहे. या नाटकाचा प्रयोग महाराष्ट्रभर होणार असून विरोध झाला तरीही या नाटकाचे प्रयोग बेळगावमध्येही होणार आहेत. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात अभिनेता सुबोध भावे काम करणार आहेत. या मुहूर्ताच्या वेळी नाट्यसंपदाचे अनंत पणशीकर, महाराष्ट्र कलानिधीचे प्रवर्तक नितेश राणे, बेळगाव महापालिकेतील विजयी उमेदवार, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.