#नितीश कुमार

Showing of 144 - 152 from 152 results
'मनसे विरुद्ध बिहारी सामना चुकीच्या बातमीमुळे'

बातम्याSep 3, 2012

'मनसे विरुद्ध बिहारी सामना चुकीच्या बातमीमुळे'

03 सप्टेंबरराज ठाकरे यांनी, 'बिहारी लोकांना घुसखोर ठरवून हाकलून देऊ' असा ठाकरी इशारा दिला आणि पुन्हा एकदा मनसे विरुद्ध बिहारी या वादाला तोंड फुटले. मात्र हा वादच खोट्या माहितीवरुन पेटला आहे. बिहारच्या मुख्यसचिवांनी महाराष्ट्र पोलिसांना कोणतेही पत्र लिहले नव्हते तर ते पत्र पोलीस महासंचालकांनी लिहले होते आणि त्या पत्राचा चुकीचा अर्थ काढून चुकीची बातमी छापण्यात आल्यामुळे मनसे विरुद्ध बिहारी असा सामना रंगला असा दावा जेडीयूचे आमदार देवेश ठाकूर यांनी आयबीएन लोकमतकडे केला आहे. नेमकं काय चुकलं ? त्याचं झालं असं की, मुंबई सीएसटी हिंसाचार प्रकरणात शहीद अमर जवान स्मारकाची तोडफोड करणार्‍या अब्दूल कादीरला मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. अब्दूल हा मुंबईतील जोगेश्वरी येथील राहणार पण मुळचा तो बिहारचा. पोलिसांनी दंगेखोरांना अटक करण्याचे सत्र सुरु केली. आणि अटकेच्या भीतीमुळे तो बिहारला पळाला. तेथून तो नेपाळला जाणार होता पण पोलिसांनी बिहार गाठून त्याला ताब्यात घेतले आणि मुंबईला आणले. यामुळे बिहारच्या पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहले. आपण जेव्हा आमच्या हद्दीत येऊन गुन्हेगाराला अटक करता त्याबद्दल अगोदर कळवावे असं पत्राद्वारे कळवले. हा पत्र व्यवहार नेहमीच्या कामाचा कायदेशीर भाग असतो. पण त्यांनी एक लिहले आणि एका इंग्रजी वृत्तपत्राने भलतेच काही समजले मग काय 'मिठ-मसाला' टाकून त्या बातमीला रंगवले. आणि ती बातमी अशी झाली, आमच्या राज्यात एखाद्या गुन्हेगाराला अटक करायची असेल तर तसे अगोदर कळवावे, तुम्ही आमच्या राज्यात येऊन गुन्हेगाराला अटक करणे कायदेशीरपणे चुकीचे आहे. जर असा प्रकार पुन्हा घडला तर तुमच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा बिहारचे मुख्य सचिव नवीनकुमार यांनी दिला. अशी बातमी छापण्यात आली. मग काय ? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अगोदरच हिंसाचार प्रकरणी 'मोर्चा' काढलेला आणि त्यांनाही माहिती कळाली. मग काय राज समाचार घेतल्यावाचून थोडे राहणार होते. त्यांनी थेट तोफ डागली आणि बिहारी लोकांना घुसखोर ठरवून हाकलून देऊ अशा ठाकरी इशारा दिला. राज यांच्या वक्तव्यावर सपाचे आमदार अबू आझमी, काँग्रेसचे आमदार संजय निरुपम, खुद्द बिहारहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर राज यांचे डोक ठिकाण्यावर नाही अशी टीका केली. या प्रकरणावरुन राज यांच्याविरोधात बिहारमध्ये खटलेही दाखल करण्यात आले आहे. पण एवढं सगळं युध्द घडलं ते एका चुकीच्या बातमीमुळे....याबद्दल जेडीयूचे आमदार देवेश ठाकूर यांनी आयबीएन लोकमतकडे या घटनेचा सविस्तर खुलासा केला. बिहारचे मुख्यसचिव नवीलकुमार यांनी असे कोणतेही पत्र लिहले नव्हते. तर पोलीस महासंचालकांनी ते पत्र लिहले होते. कायद्याप्रमाणे कोणत्याही गुन्हेगाराला दुसर्‍या राज्यात जाऊन परस्पर अटक करता येत नाही. आपल्याला जर अशी कारवाई करायची असेल तर अगोदर आपण तसे पत्र पाठवावेत अशी विनंती केली होती. पण एका चुकीच्या बातमीमुळे सगळा प्रकार घडला असा दावा ठाकूर यांनी केला.

Live TV

News18 Lokmat
close