#नासा

Showing of 66 - 68 from 68 results
मंगळावर आहे वाहते पाणी : नासा

बातम्याAug 5, 2011

मंगळावर आहे वाहते पाणी : नासा

05 ऑगस्टनासाच्या शास्त्रज्ञांना एक अतिशय महत्त्वाचा शोध लागला. मंगळावर वाहते पाणी असल्याची घोषणा नासाच्या शास्त्रज्ञांनी केली. नासाच्या मार्स रिकॉनिझन्स ऑर्बिटर म्हणजेच एमआरओ (MRO) या अंतराळ यानाने हा शोध लावलाय. एमआरओनं मंगळावरच्या वेगवेगळ्या हवामानातील फोटो टिपले आहेत. त्यांचा अभ्यास केल्यानंतर नासाला उन्हाळ्याच्या दिवसांत मंगळावर पाणी वाहत असल्याचे दिसून आले. पाण्याचा हा प्रवाह हिवाळ्यात गोठतो. आणि पुन्हा उन्हाळ्यात सुरू होतो, असंही शास्त्रज्ञांचं निरीक्षण आहे. हे पाणी खारं असल्याचा दावा नासाने केला. या शोधामुळे मंगळावर वसाहत निर्माण करण्याच्या माणसाच्या इच्छाशक्तीला बळ मिळणार आहे.