#नाशिक

Showing of 2783 - 2796 from 2863 results
लातुर बोर्डाची शिल्पा हिरेमठ राज्यात पहिली

बातम्याJun 25, 2009

लातुर बोर्डाची शिल्पा हिरेमठ राज्यात पहिली

25 जून 2008-2009 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाले असून उस्मानाबादची शिल्पा हिरेमठ ही मुलगी राज्यात आणि मुलींमध्ये पहिली आली आहे. लातुर बोर्डातून दहावीची परीक्षा दिलेल्या शिल्पाला 98.61 टक्के गुण मिळाले असून ती उमरग्याच्या आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. शिल्पाला एकूण 641 इतके गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या राज्य माध्यमिक शालान्त परीक्षेत मुलींनी मारलेल्या बाजीचा रेकॉर्ड यंदाही कायम ठेवण्यात आला आहे. राज्यात पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनीच स्थान पटकावलं आहे. बुलढाण्याच्या भारत विद्यालयाची श्रुती सुरूशे राज्यात दुसरी आलीय. तिला एकूण 635 गुण मिळाले असून तिच्या 97.69 ही तिच्या गुणांची टक्केवारी आहे. नागपूरच्या सोमलवार हायस्कूलची अश्विनी मराठे राज्यात तिसरी आली आहे. तिला 634 गुण मिळाले असून 97.53 ही तिच्या गुणांची टक्केवारी आहे. तर राज्यात नाशिक विभागचा 87.93 टक्के इतका सर्वाधिक निकाल लागला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा 84.21 टक्के निकाल लागला आहे.राज्याचा विभागवार निकाल खालीलप्रमाणे - नाशिक विभाग : 87.93%कुमुदिनी अहिरे आणि गौरव पालटशहा नाशिक विभागून 95.53 टक्के गुण मिळवून पहिले तर आकाश कोळी दुसरा.पुणे विभाग 87.92%अभय चाटे आणि नचिकेत कुंटला 96.46 टक्के गुण मिळवून पुणे विभागातून सर्वप्रथम.श्रृती लाटणे, पूजा पाटील आणि शैलेश पुरूळेकर 96.15 टक्के गुण मिळवून पुणे विभागात दुस-या स्थानावर.मुंबई विभाग : 85.30% मुंबई विभागात पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलींची बाजी. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी हायस्कूलची सोनल चव्हाण 96.46 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम.बालमोहन विद्यामंदिर शाळेची निशिगंधा खैरे, वसईच्या सेंट ऍन्थनी शाळेचा संकेत पाटील आणि ठाण्याच्या सरस्वती विद्यामंदिरची शेफाली महादळकर हे तिघं 96.30 टक्के गुण मिळवून मुंबईतून दुसरे.ठाण्याच्या ए.के. जोशी शाळेची तेजल प्रधान आणि सुळे गुरुजी विद्यालयची मृण्मयी जाधव मुंबईतून 96.15 टक्के गुण मिळवून तिसरे.औरंगाबाद विभाग 83.71% करण कलानी औरंगाबादमधून पहिला.लातुर विभाग 82.84%उमरग्याच्या आदर्श विद्यालयाची शिल्पा हिरेमठ राज्यातून आणि मुलींमधून 98.61 टक्के गुण मिळवून पहिली. नागपूर विभाग 80.69%सोमलवार हायस्कूलची अश्विनी मराठे राज्यात 97.53 टक्के गुण मिळवून राज्यात तिसरी. कोल्हापूर विभाग 77.81%कोल्हापूर विभागातून अपूर्वा जगदीश पाऊसकर पहिली आली आहे. तिने 97.23 टक्के गुण संपादित केले आहेत. याच कोल्हापूरमधून सोनिया लुणावत आणि पियुष सावंत हे दोघं राज्यात दुसरे आले असून त्यांना अनुक्रमे 97.07 टक्के इतके गुण मिळाले आहेत. अमरावती विभाग - बुलढाण्याची श्रृती सुरुशे राज्यात आणि अमरावती विभातून पहिली. अकोल्याच्या छत्रपती विद्यालयाची सारिका मेंडके अमरावती विभातून दुसरी. सिटी हायस्कूल अचलपूरची ऋचा पाऊसकर आणि दर्यापूरच्या प्रबोधिनी विद्यालयाची स्वाती जामनिक विभातून तिस-या.मागासवर्गीय विभागसातार्‍याच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचा पियुष सावंत 97.07 टक्के गुण मिळवून राज्यात पहिला. लातुरच्या देशीकेंद्र हायस्कूलची माधुरी दिघोळे 96.76 टक्के गुण मिळवून राज्यात दुसरी. नागपूरच्या विमलताई तिरके शाळेची इशा गजभिये 96.61 टक्के गुण मिळवून राज्यात तिसरी तर समर्थ हायस्कूलचा रोहन धगिते विभागातून तिसरा.रात्रशाळा विभागमाहीमची सोनल सिंग ही कनोसा नाईट हायस्कूलची विद्यार्थिनी 84.15 टक्के गुण मिळवून राज्यात पहिली.सांगलीच्या नाईट हायस्कूलचा सुनील वेसणेकर 78.61 टक्के गुण मिळवून मिळवून राज्यात दुसरा.नागपूरच्या शिवाजी नाईट हायस्कूलचा रमीझ बख्शी 78.46 टक्के गुण मिळवून राज्यात तिसरा.अपंग विद्यार्थी विभागकोल्हापूरचा श्रीनाथ घाडगे हा अपंग विद्यार्थ्यात 96.92 टक्के गुण मिळवून राज्यात पहिला. नागपूरचा प्रीतेश मातूरकर 95.38 टक्के गुण मिळवून राज्यात दुसरा. नांदेडची अंकिता मांजरमकर 94.76 टक्के गुण मिळवून राज्यात तिसरी. बोर्डाच्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि लातुर या आठ विभागीय मंडळामार्फत मार्च 2009 मध्ये परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला. या परीक्षेला संपूर्ण राज्यातून एकूण 16 लाख 3 हजार 144 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये 8 लाख 96 हजार 748 विद्यार्थी आणि 7 लाख 6 हजार 396 विद्याथिर्नी आहेत. एकूण 3 हजार 693 परीक्षा केंद्रांवर बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती. सकाळी अकरा वाजल्यापासून गुणपत्रिकांचं वाटप करण्यास सुरुवात झाली. निकाल मिळाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे त्यांना 6 जुलै 2009 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. तसंच ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी 6 जुलै आणि विलंब शुल्कासह 16 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे.