#नाशिक

Showing of 14 - 27 from 1241 results
VIDEO : धावत्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये अशी साजरी झाली दिवाळी

व्हिडिओNov 2, 2018

VIDEO : धावत्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये अशी साजरी झाली दिवाळी

नाशिक-मुंबईदरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. पासधारक प्रवाशांच्या डब्यात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक-मुंबईदरम्यान अनेक प्रवासी दररोज रोजगारानिमित्त ये-जा करत असतात. दिवसाचे सात तास वर्षोनुवर्षे सोबत घालवणाऱ्या या प्रवाशांमध्ये साहजिकच स्नेहभाव आणि ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळेच हे प्रवासी प्रत्येक सण गाडीत साजरा करतात. आज अशाचप्रकारे गाडीत दिवाळीचा सणही उत्साहात साजरा करण्यात आला. पासधारक प्रवाशांच्या डब्यात दिवाळीनिमित्त सजावट करून कंदील लावण्यात आले होते. तसंच एकमेकांना फराळ आणि मिठाई वाटून प्रवाशांनी आनंद साजरा केला.

Live TV

News18 Lokmat
close