#नारायण राणे

Showing of 326 - 328 from 328 results
मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं राणे निराश झालेत का ? (भाग 2 )

देशDec 11, 2008

मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं राणे निराश झालेत का ? (भाग 2 )

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पदाची शपथ घेण्याअगोदरपासूनच नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षावर, पक्षश्रेष्ठींवर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखयांच्यावर अनेक आरोप केले. कणकवलीच्या सभेत त्यांनी, आता एक तर मी संपेन अगर काँगेसला तरी संपवेन असं विधान केलं. स्वत:ला मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे राणे असे वागत आहे का ? राणेंची अशी विधानं हताशेपोटी, निराशेमुळे होतं आहेत का की ही त्यांची एक राजकीय खेळी आहे. यावर आहे आजचा सवाल मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं राणे निराश झालेत का ?या चर्चेत सहभागी झाले होते काँग्रेस, आमदार-भाई जगताप, राणेसमर्थक नवी मुंबईचे माजी महापौर आणि पेट्रोलियम महामंडळाचे,अध्यक्ष- चंदू राणे आणि महानगरचे कार्यकारी संपादक- युवराज मोहिते.आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी चर्चेला सुरुवात करताना चंदू राणे यांना प्रश्न केला की नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे ते असे वागत आहेत का? यावर चंदू राणे म्हणाले मुळात जनतेची इच्छा होती की राणे मुख्यमंत्री व्हावेत. कारण महाराष्ट्रात आज जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तोंड देण्यासाठी करारी नेता हवा यासाठी राणेंच मुख्यमंत्रीपदी होणं गरजेचं होतं. तसचं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अहमद पटेल यांनी स्वत: येऊन राणेंना मोठं पद देऊ असं सांगितलं होतं. पण त्यांनी आपला शब्द पाळला नाही म्हणून राणेंनी बंड केलं असं त्यांचं मतं होतं. यावर काँग्रेस आमदार भाई जगताप म्हणाले काँग्रेसमध्ये कोणाला आधी सांगून पद दिले जात नाही. प्रत्येकाच्या कामामुळे काँगेसमध्ये माणूस मोठा होतो. आणि जनतेने निवडून दिलेले आमदार आपला नेता निवडतात त्यामुळे जनतेच्या इच्छेचा प्रश्नच निर्माण होतं नाही. महानगरचे कार्यकारी संपादक यांनी काँगेसचा इतिहास पाहिला तर काँग्रेस कोणालाही आश्वासन देत. पदासाठी आम्ही तुम्हाला पक्षात घेऊ असं म्हणून पक्षात घेत नाही. त्यांची सूत्र दिल्लीतून हलवली जातात. तसंच ते म्हणाले राणे पद मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. राणे एक अस्वस्थ आत्मा आहेत. राणेंनी मुख्यमंत्री निवडच्या वेळेही गोंधळ घातला.त्याविषयी भाई जगताप म्हणाले की गेले तीन वर्षे राणे काँग्रेसमध्ये आहेत पण त्यांना काँग्रेसची संस्कृती समजली नाही. काँग्रेसला 130 वर्षांची परंपरा आहे. गेली 48 वर्षे काँग्रेसने महाराष्ट्रात राज्य केलं त्यामुळे त्या पक्षाला,त्याच्या कार्यपद्धतीला समजणं राणेंना गरजेचं होतं ते त्यांनी केलं नाही म्हणून राणेंवर ही वेळ आली आहे. आजही ते शिवसेनेमधली राडापद्धतीचा अवलंब करताना दिसतात. राणेंच्या वागणुकी विषयी बोलताना युवराज मोहिते सांगतात की, राणेंना अजूनपर्यंत काँग्रेसनेच वाचवलं आहे. काँग्रेसने पूर्वी कम्युनिस्टांना संपवण्यासाठी शिवसेनाचा वापर केला तसा शिवसेनेला संपवण्यासाठी आज काँग्रेसने नारायण राणेंचा वापर केला. पण राणेंविरुद्धचं शस्त्र आता काँग्रेसवरच उलट फिरल्यामुळे राणेंबरोबरच काँग्रेसही तितकीच दोषी आहे. त्यामुळे काँगेसने पहिली माफी मागितली पाहिजे आणि दुसरं म्हणजे राणे आज जे आरोप करत आहेत त्याला कोणीही फारसं महत्त्व देतं नाही.शेवटी निखिल वागळे यांनी राणेंच्या बंडाचा काय परिणाम होणार असा प्रश्न केला असता चंदू राणे म्हणाले राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. त्यांना काढून टाकलेलं नाही. वेळ आल्यावर राणे योग्य तो निर्णय घेतील.पण भाई जगताप म्हणाले काँग्रेस संपण्याची भाषा करणारे स्वत: संपले. तसंच कोकणातील सिंधुदुर्ग वगळता राणेंना इतर ठिकाणी कोणताही पाठिंबा नाही. याप्रश्नाचं उत्तर देताना युवराज मोहिते म्हणाले राणेंनी अशी विधान करून स्वत:च्या पायावर दगड टाकून घेतला आहे. त्याच्या या कृतीमुळे राजकारणात शिवसेनेला फायदा होणार का ते आता पाहायचं आहे. राणेंच हे जे चाललं आहे ही त्यांच्या अगतिकतेमुळे होतं आहे. ही वृत्ती राजकारणात घातक ठरते. राणेंची ताकद शिवसेनेतही होती आणि त्याचा फायदा काँग्रेसनेही करून घेतला. परंतु ह्या ताकदीचा वापर चुकीच्या मार्गाने केला तर राजकारणात ती धोकादायक ठरते आणि सर्वनाशाला कारणीभूत ठरते. आत्ता राणेंचा प्रवासही अशाच मार्गाने होत आहे का हे तपासलं पाहिजे. असं म्हणून निखिल वागळे यांनी करून आजचा जनतेचा कौल पाहिला असता 79%जनतेनं नारायण राणे निराश झाले असं मतं दिलं.