नाती

Showing of 66 - 79 from 114 results
VIDEO : घरफोडीच्या राजकारणावर धनंजय मुंडेंचं पंकजांना प्रत्युत्तर

महाराष्ट्रFeb 6, 2019

VIDEO : घरफोडीच्या राजकारणावर धनंजय मुंडेंचं पंकजांना प्रत्युत्तर

06 फेब्रुवारी : न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी घरफोडीच्या राजकारणावर आपली भूमिका मांडली.'माझं घरफोडीला समर्थन नाही. राजकारणात घरफोडीच्या घटना आजपर्यंत खूप घडल्या आहे. जयदत्त क्षीरसागर यांचं घर कुणीही फोडलं नाही. घर सांभाळून ठेवणे हे घरच्या मोठ्या व्यक्तीचे काम आहे. अलीकडेच झालेल्या मेळाव्यात जयदत्त क्षीरसागर कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुळात घरफोडी आणि राजकारणातील घरफोडी ही वेगळी आहे' असं मत धनंजय मुंडेंनी व्यक्त केलं आहे. बीडमध्ये आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी कुणाचं घर फोडून राजकारण करू नये असा टोला धनंजय मुंडेंना लगावला. "घर फोडण्याचं पातक लागू नये, एवढ्या खालच्या पातळीच राजकारण नसावं. राजकारणातही काही गोष्टी पाळल्याच पाहिजेत. रक्ताची नाती जेव्हा तुटतात तेव्हा त्याची वेदना काय असते ते मी भोगलं आहे. त्यामुळे असाच प्रसंग जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात आला तेव्हा मी त्यांच्या पाठिशी राहिले."

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading